ठाणे:कल्याणमधील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थींनीशी इंस्टाग्रामवर मैत्री करत ७ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्काद...
ठाणे:कल्याणमधील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थींनीशी इंस्टाग्रामवर मैत्री करत ७ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
या नराधम आरोपींनीअल्पवयीन विद्यार्थिनीसोबत संबंध प्रस्थापित करून तिचा व्हिडीओ तयार केला होता. त्यानंतर, हाव्हिडीओ आपल्या मित्रांना पाठवला. तसेच, तिचा हा अश्लिलव्हीडीओव्हायरल करण्याची धमकी देत ७ तरुणांनी त्या अल्पवयीन विद्यार्थींनीवर जवळपास ५ महिने सामूहिक बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना घडकीस आली आहे. या नराधमांनी तिचा अश्लील व्हिडीओव्हायरलकेल्याप्रकरणीकल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्याने एकूण ७ नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर, आरोपींनान्यायालयात हजर केले असता, कल्याण न्यायालयाने सातही जणांना ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन विद्यार्थींनीवर अत्याचार करणारे हे नराधम धनाढ्य कुटुंबातील असल्याची माहिती आहे.
कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थींनी तिच्या आईसोबत राहते. शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थींनीचा अश्लिल व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. ही मुलगी ५ महिन्यांपासून आधीच मानसिक तणावाखाली होती. जेव्हा तिला कुटुंबीय विचारत होते की काय झाले, तेव्हा ती घरच्या मंडळींना काही सांगतही नव्हती. मात्र,तिचा हा व्हिडीओव्हायरल झाल्यानंतर सत्य समोर आलं. या मुलीसोबत एप्रिल महिन्यात राहुल भोईर नावाच्या तरुणाने इंस्टाग्रामवर मैत्री केली. या मैत्रीतून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर, मुलीसोबत लैगिंक अत्याचार केला, त्याचा व्हिडीओही तयार केला. तो व्हीडीओ राहुलने दुसरा तरुण देवा पाटील याला पाठविला. देवा पाटीलने त्या मुलीस व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीदेत तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. देवानंतर अजित सुरवसे, गौरव सुरवसे, हर्षलपोळसे, जयेश मोरे आणि किरण सुरवसे यांना हाव्हिडीओ पाठविण्यात आला. त्यानंतर, या सर्वांनी तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली.
दरम्यान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे हे सगळे आरोपी मुरबाड आणि भिवंडी परिसरात राहणारे आहेत. आरोपी धनाढ्य कुटंबातील आहे, या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. या सातही आरोपींना कल्याणच्या पोक्सो विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी,न्यायालयाने सातही आरोपींना ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


COMMENTS