बीड: बीडमधील स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याची त्याच्या मित्रानेच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महि...
बीड: बीडमधील स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याची त्याच्या मित्रानेच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिनाभरापूर्वी बर्थ डे पार्टीत झालेल्या वादातून यशची हत्या केल्याचे सांगितले जात होते.
मात्र, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
यश ढाका याचं वाल्मीक कराड कनेक्शन समोर आले आहे. यशचा एक जुना फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसोबत एका कार्यालयात उभा असल्याचे दिसत आहे. त्याचा हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोला एडिट करून डायलॉग लावण्यात आला आहे.
यश ढाका याच्या फोटोला एडिट करून "मैं अपने आप को पुलीस के हवाले कर रहा हू, अपने पैसे, अपने दबदबे, अपने बल से.. मैं तो छूट जाऊंगा लेकिन तेरा क्या होगा मेरे दोस्त, तेरा क्या होगा?" अशा प्रकारचा डायलॉग यशच्या फोटोला जोडण्यात आला आहे. त्याचा हा फोटो आणि डायलॉग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या डायलॉगचं कनेक्शन थेट त्याच्या हत्येशी देखील जोडले जाऊ लागले आहे.
दरम्यान, बीड शहरात गुरुवारी (ता. २५) रात्री यश देवेंद्र ढाका (वय २२) याची हत्या झाली. ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर त्याचा एकेकाळचा मित्र सूरज काटे याने केली. सूरजने यशच्या पोटात चाकू खुपसून त्याला रक्तबंबाळ केले. हा हल्ला इतका भयंकर होता की यातच त्याचा जीव गेला. जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS