सोलापूर : नर्तकी पूजा गायकवाड हिने माजी उपसरपंच गोविंद बर्गे अन् तिच्या प्रेमाबाबत कबुली दिली आहे. पूजा गायकवाड हिला गोविंद बर्गे यांच्या आत...
सोलापूर : नर्तकी पूजा गायकवाड हिने माजी उपसरपंच गोविंद बर्गे अन् तिच्या प्रेमाबाबत कबुली दिली आहे. पूजा गायकवाड हिला गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन दिवसाची पोलिस कोठडी आहे.
त्यामुळे पोलिस आता सगळ्या बाजूने तपास करत आहे.
लुखमसला (ता. गेवराई, बीड) येथील माजी उपसरपंच आणि प्लॉटिंग व्यवसायातून बक्कळ पैसा कमावणारे गोविंद बर्गे हे एका कला केंद्रातील नर्तिकेच्या प्रेमात अडकले. लग्न झालेले असूनही त्यांनी तिच्यावर पाण्यासारखा पैसा उधळला. महागडा मोबाइल, मोटारसायकल, प्लॉट, सोन्याचे दागिने अशा अनेक भेटवस्तूंसोबतच लाखो रुपयेही तिच्यावर खर्च केले. पूजा गायकवाड हिने गेवराईतलं घर नावावर करा. माझा वाढदिवस जवळ आहे, त्यावेळी ते नावावर केले नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करीन अशा धमक्या ती देऊ लागली, असा आरोप बर्गेंच्या नातेवाइकांनी केला आहे. या सततच्या दबावामुळे मानसिक खचलेले गोविंद बर्गे मंगळवारी पूजाच्या घरासमोर गाडीमध्ये बसले आणि स्वतःच्या पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना घडताच परिसरात खळबळ उडाली.
बर्गेंच्या कुटुंबीयांनी पूजाविरोधात गंभीर आरोप केले असून वैराग पोलिसांनी तिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. तिला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडी दिली आहे. गोविंद बर्गे यांच्यासोबत आपले संबंध असल्याची पूजा गायकवाडने पोलिसांना कबुली दिली आहे.
दरम्यान, गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाडच्या घरासमोर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली, तेव्हा पूजा गायकवाड ही सासुरे गावात नसल्याचे समोर आहे. त्यावेळी ती पारगाव येथील कला केंद्रात रात्रभर असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. पूजा गायकवाडचा कॉल लागत नसल्यामुळे गोविंद बर्गे हा गेवराईवरून तिला शोधत बार्शी तालुक्यातील वैरागजवळ आले होते. तिथे आल्यावर गोविंद यांनी पूजाला अनेक फोन केले होते. गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यातील कॉल संबंधावरून आता तपासाची दिशा ठरणार आहे. पूजा गायकवाड हिला गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन दिवसाची पोलिस कोठडीत आहे. त्यामुळे पोलिस आता सगळ्या बाजूने तपास करत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी गोविंद बर्गे यांच्या मित्र परिवाराने केली आहे.


COMMENTS