भवनेश्वर (ओडिसा): एका विद्यार्थ्याने आपल्या मित्रांच्या डोळ्यात चक्क फेविक्विक टाकले आहे. यामुळे तब्बल 8 विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्या...
भवनेश्वर (ओडिसा): एका विद्यार्थ्याने आपल्या मित्रांच्या डोळ्यात चक्क फेविक्विक टाकले आहे. यामुळे तब्बल 8 विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांना वेळेवर उपचार मिळाल्याने गंभीर परिणाम झाले नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
ओडिसा राज्यातील कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया तालुक्यातील सेबाश्रम स्कुल या शाळेत हा प्रकार घडला आहे. या शाळेचे वसतिगृहदेखील आहे. या वसतीगृहात रात्री झोपलेल्या आठ विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला आहे. वसतीगृहातील एका विद्यार्थ्याने आपल्यासोबतच्या अन्य विद्यार्थ्यांच्या डोळ्यात फेविक्विक टाकले. आपले डोळे उघडत नसल्याने हे विद्यार्थी हैरान झाले आणि त्रास होऊ लागल्याने मोठ-मोठ्याने रडू लागले. त्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला. ही घटना घडली त्या शाळेचे नाव सेबाश्रम स्कुल असे आहे.
डोळ्यात फेविक्विक टाकल्यानंतर या आठ विद्यार्थ्यांना काहीच दिसत नव्हते. मुलांच्या डोळ्यात फेविक्विक टाकल्याचे समोर येताच त्या विद्यार्थ्यांना गोछापडा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांची परिस्थिती लक्षात घेता लगेच त्यांना फुलबानी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांची एक टीम या विद्यार्थ्यांवर उपचार करत आहे. सध्या सात विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार केला जात आहे. तर उर्वरित एका विद्यार्थ्याची प्रकृती चांगली असल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. वेळेवर उपचार मिळाल्याने या गंभीर परिणाम झाले नाही. सध्या हे विद्यार्थी डॉक्टरांच्या निगराणीखाली असणे गरजेचे आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दरम्यान, शाळेचे मुख्याध्यापक मनोजंजन साहू यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही ही घटना नेमकी कशी घडली? घटना घडली तेव्हा वॉर्डन कुठे होते याचा तपास करा? असा आदेश दिला आहे.


COMMENTS