जुन्नर | जुन्नर तालुक्यातील केवाडी गावचे रहिवासी व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम सखाराम लांडे यांना आज बुधवार दि. १० सप्टेंबर २०२...
जुन्नर | जुन्नर तालुक्यातील केवाडी गावचे रहिवासी व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम सखाराम लांडे यांना आज बुधवार दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अटक करण्यात आली.
सविस्तर बातमी अशी की, आज बुधवार १० सप्टेंबर रोजी देवराम लांडे यांचा वाढदिवस होता, या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सकाळी ११. ३० वाजता त्यांच्या निवासस्थानापासून मिरवणूक काढण्यात आली होती मात्र ही मिरवणूक मार्केटयार्ड मध्ये आली त्यानंतर तेथील उतरत्या रस्त्यावर ढोल ताशा झाँज पथक व त्यामागे डीजे गाडी व त्यामागे देवराम लांडे यांची गाडी असा ताफा सुरू असताना अचानक डीजेच्या वाहनावरील चालकाचा ताबा सुटून गाडी थेट झाँज पथकात घुसली व त्यात तीन ते चार जण गंभीर जखमी झाले व एकाचा दवाखान्यात नेल्यानंतर मृत्यू झाला, सदर घटनेत आदित्य सुरेश काळे हा दुर्देवी मृत्यूमुखी झाला त्यानंतर नातेवाईकांचा जुन्नर पोलीस स्टेशन येथे आक्रमक पवित्रा घेत आयोजक देवराम लांडे यांना अटक झाली पाहिजे व डीजेच्या मालक व चालक तसेच आयोजक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी जमाव जमला होता त्यानंतर देवराम लांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली असून डीजे मालक सौरभ शेखरे यांना अटक केली असून अमोल लांडे व चालक नामदेव रोकडे हे फरार आहेत सदर घटनेचा अधिक तपास जुन्नर पोलीस स्टेशन करत आहे.


COMMENTS