छत्रपती संभाजीनगर: पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेनं बाळाला जन्म दिला. पण, अवघ्या दोन तासांत त्याला गोणीत गुंडाळून रस्त्यावरील कचऱ्यात फ...
छत्रपती संभाजीनगर: पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेनं बाळाला जन्म दिला. पण, अवघ्या दोन तासांत त्याला गोणीत गुंडाळून रस्त्यावरील कचऱ्यात फेकून दिले. रात्रीच्या थंडीत कुडकुडणाऱ्या बाळाचे कुत्र्याने लचके तोडले, तरीही हे बाळ मृत्यूला पुरुन उरलं.या प्रकरणी पोलिसांनी बाळाच्या आईवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुंडलिकनगर येथील गजानन महाराज मंदिर रस्त्यावर गुरुवारी (ता. २८) पहाटे ५:३० वाजता ही घटना उघडकीस आली. एका युवतीने (वय २४) कुटुंबापासून आपली गर्भधारणा लपवण्यासाठी घरातच बाळाला जन्म दिला आणि त्याची नाळ कापली. त्यानंतर बाळाला एका गोणीत गुंडाळून कचऱ्यात फेकून दिले. पहाटेच्या थंडीत हे बाळ गारठले. भटक्या कुत्र्यांनी गोणीला दोन वेळा लचके तोडले. शिवाय, बाळ असलेले ही गोणी एकदा बसखालीही आली. तरीही बाळ सुरक्षित राहिले. काही सतर्क नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्यांनी बाळाच्या आईचा शोध घेत, तिला ताब्यात घेतले आहे. तिची चौकशी केली असता, तिनेच आपल्या बाळाला अशाप्रकारे कचऱ्यात टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. बाळ सध्या रुग्णालयात असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
.


COMMENTS