मुंबई :उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. ...
मुंबई :उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या विजयासाठी भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
फडणवीस यांनी थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधत पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.


COMMENTS