पुणे: प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून एका युवकाची कात्रज घाटात हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रायगड प...
पुणे: प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून एका युवकाची कात्रज घाटात हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, इतर तिघांना अटक केली आहे.
सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. मांगडेवाडी, कात्रज, पुणे) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी श्रीमंत अनिल गुज्जे (वय २१), संगम नामदेव क्षीरसागर (वय १९) आणि नितीन त्र्यंबक शिंदे (वय १८) या तिघांना अटक केली आहे, तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कात्रजमधील मांगडेवाडी परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. सौरभ आठवले हा त्याच परिसरात राहत होता आणि तो त्या मुलीला आपली मानलेली बहीण मानत होता. तो दररोज तिला शाळेत सोडायला जायचा. सौरभला या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्याने ती माहिती मुलीच्या आई-वडिलांना दिली. त्यामुळे अल्पवयीन मुलाच्या प्रेमसंबंधात अडथळे निर्माण झाला होता.
अल्पवयीन मुलाने आपल्या साथीदारांच्या मदतीने सौरभला संपवण्याचा कट रचला. जुन्या कात्रज बोगद्याजवळील डोंगरावर सौरभचा खून करून त्याचा मृतदेह तिथेच फेकून दिला. दरम्यान, डोंगरावर फिरायला गेलेल्या नागरिकांना एका युवकाचा मृतदेह दिसला. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. राजगड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आणि मृतदेहाची ओळख पटवली. तपासादरम्यान प्रेमप्रकरणातून झाल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत सौरभच्या खुनातील आरोपींना शोधून काढले आणि त्यांना अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS