ठाणे: भिवंडी न्यायालयात सुनावणीसाठी आलेला आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन न्यायालयाच्या आवारातून पळ काढल्याची घटना घडली आहे. सलामत अली ...
ठाणे: भिवंडी न्यायालयात सुनावणीसाठी आलेला आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन न्यायालयाच्या आवारातून पळ काढल्याची घटना घडली आहे. सलामत अली अन्सारी असे फरार आरोपीचे नाव असून त्याला बिहारमधून अटक करण्यात आली होती.एका चिमुकलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्याचा आरोप त्याच्यावर आहे. या घटनेनंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
भिवंडी शहर पोलिस ठाणे हद्दीतील एका चाळीत राहणाऱ्या चिमुकलीवर (वय ६) शारीरिक अत्याचार करण्यात आला होता. त्यानंतर त्या चिमुरडीची हत्या करून तिचा मृतदेह एका बंद असलेल्या खोलीतील बादलीत कोंबून ठेवण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी सलामत अन्सारी हा पसार झाला होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात हत्येसह पोस्को अंतर्गत दाखल गुन्ह्यात पोलिसांनी 20 सप्टेंबर 2023 रोजी मोठ्या शिताफीने सलामत अली याला बिहार येथून ताब्यात घेत अटक केली होती. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल असून तो सध्या ठाणे कारागृहात बंदी होता.
सलामत अली याला ठाणे कारागृहातून भिवंडी न्यायालयात आज (सोमवार) न्यायालयीन सुनावणीसाठी आणण्यात आले होते. यावेळी सलामत अली याने बंदोबस्तावरील पोलिस बेसावध असल्याचा फायदा घेत न्यायालयाच्या आवारातून पळ काढला. त्यानंतर बंदोबस्तावर असलेला असताना पोलिसांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. पण तो आढळून आला नाही. पोलिस पसार झालेल्या सलामत अलीचा शोध घेत आहेत.ल्या


COMMENTS