छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या एका महिलेने आणि तिच्या नातेवाइकांनी पोलिस ठाणे अंमलदार म्हणून कार्य...
छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या एका महिलेने आणि तिच्या नातेवाइकांनी पोलिस ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत असलेल्या महिला पोलिसाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या मारहाणीत महिला पोलिस कर्मचारी बेशुद्ध पडल्या असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या एका महिलेचा पोलिसांशी वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. संबंधित महिलेने आणि तिच्यासोबत आलेल्या दोन नातेवाइकांनी महिला पोलिस कर्मचाऱ्याचा गळा दाबून मारहाण केली. महिला पोलिस कर्मचारी जागीच बेशुद्ध पडल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणी मारहाण करणाऱ्या महिलेसह तिच्या दोन नातेवाइकांविरुद्ध सिल्लोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.


COMMENTS