धाराशिव: HIVबाधित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या मुलीचा गर्भपात देखील करण्यात...
धाराशिव: HIVबाधित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या मुलीचा गर्भपात देखील करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
औसा तालुक्यात एका नामवंत एचआयव्ही बाधित संगोपन संस्था आहे.
या संस्थेत एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. तसेच बलात्कारनंतर सदर मुलीचा गर्भपात देखील केला. या गर्भपातामुळे सदर धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पीडित मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मुलीच्या तक्रारीवरून ढोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीवरून ढोकी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या संस्थेतील आणखी काही मुलींवर अत्याचार झाला असल्याची मुलीची तक्रारीत माहिती आहे. ढोकी पोलिसातील गुन्हा औसा पोलिसांमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली असून अद्यापपर्यंत कोणालाही अटक नाही. औसा तालुक्यातील या नामवंत संस्थेला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे या घटनेने शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ उडाली आहे.


COMMENTS