बीड! पोलिसांनी घेतली झाडाझडती अन् कैद्याच्या अंडरवेअरमध्ये निघाले. | CrimeNama
Loading ...

बीड! पोलिसांनी घेतली झाडाझडती अन् कैद्याच्या अंडरवेअरमध्ये निघाले.

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड शिक्षा भोगत असलेल्या बीड जिल्हा कारागृहात एका आरोपीकडून गांजासदृश पदा...



बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड शिक्षा भोगत असलेल्या बीड जिल्हा कारागृहात एका आरोपीकडून गांजासदृश पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कारागृहामध्ये अंमली पदार्थांची तस्करी कोण करतंय?

याबाबत विविध तर्कवितर्कांना ऊत आला आहे. संबंधित न्यायालयीन बंदीकडून गांजासदृश पदार्थ जप्त करण्यात आला असून, दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत जप्तीची कारवाई आणि पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याच्या आरोपांमुळे बीड जिल्हा कारागृह चर्चेत आले होते. आता त्याच कारागृहात गांजासदृश पदार्थ सापडला आहे. सुभेदार बलभीम चिचाणे आणि पोलीस हवालदार अब्दुल वाजेद अब्दुल अजिज हे कर्तव्यावर असताना बराक क्रमांक 7 मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदी अक्षय ऊर्फ चिंटू मिठ्ठू गायकवाडची हालचाल संशयास्पद वाटली. त्याची झडती घेतली असता, त्याच्या अंडरविअरमध्ये रबरी फिकट आकाशी रंगाचा चिरलेला बॉल आढळून आला, ज्यामध्ये गांजासदृश पदार्थ सापडला. तसेच, त्याच्या पँटच्या खिशात असलेल्या पुडीत हिरवट रंगाचा पाला, बारीक भुरकट पदार्थ, हिरवट रंगाची फुले, बिया, बोंडे आणि काड्या असा अंमली पदार्थसदृश मुद्देमाल मिळाला. हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


दरम्यान, अक्षय गायकवाड याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे बीड जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,79,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3703,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1182,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,517,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,295,Maharashtra,1690,Mumbai,407,Nagpur,47,Nashik,56,Politics,601,Pune,1861,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,41,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: बीड! पोलिसांनी घेतली झाडाझडती अन् कैद्याच्या अंडरवेअरमध्ये निघाले.
बीड! पोलिसांनी घेतली झाडाझडती अन् कैद्याच्या अंडरवेअरमध्ये निघाले.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhUpg_vPRq2tvyFO4ba6nPli-9fD-xWOhpc3bSHSepeI1BdJyermmXS2Wrcv-JDY3oUH0aj_KLKtBzbk3YnSIYn4QxtVhaYReAXHt1ujjzWU3D2xvB9sGJBngDTmKE7W6GFQ0rrJPtIibk9cCsSW1Z25MCYqq7WCQaEwCUWA6UVyY3gJSo9w6B5qkSl7Ig/s320/1001043654.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhUpg_vPRq2tvyFO4ba6nPli-9fD-xWOhpc3bSHSepeI1BdJyermmXS2Wrcv-JDY3oUH0aj_KLKtBzbk3YnSIYn4QxtVhaYReAXHt1ujjzWU3D2xvB9sGJBngDTmKE7W6GFQ0rrJPtIibk9cCsSW1Z25MCYqq7WCQaEwCUWA6UVyY3gJSo9w6B5qkSl7Ig/s72-c/1001043654.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/07/blog-post_97.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/07/blog-post_97.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content