बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचे अनेक कारनामे समोर येताना दिसत आहेत. वाल्मिक कराड याच...
बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचे अनेक कारनामे समोर येताना दिसत आहेत. वाल्मिक कराड याचा राइट हँड अशी ओळख असलेल्या गोट्या गिते याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत गोट्या गिते अघोरी प्रकार करताना दिसत आहे.
गोट्या गिते हा एक अघोरी कृत्य करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दारूच्या नशेत तो ‘राम नाम सत्य है…’ असे म्हणत रात्रीच्या वेळी एका घराबाहेर नैवेद्य ठेवताना दिसत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसऱ्या व्हिडिओ मध्ये गोट्या गित्तेच्या हातात बंदूक असून, संबंधित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गोट्या गिते हा वाल्मिक कराडचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू सहकारी मानला जातो. याआधी संतोष देशमुख हत्या प्रकरणात “वाल्मिक अण्णा माझे दैवत” अशा आशयाच्या पोस्ट्स त्याने सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता. परळी मधील महादेव मुंडे हत्या प्रकरण बापू आंधळे खून प्रकरण यात अनेकांनी गोट्या गितेवर आरोप केले आहेत. तसेच इतर गुन्ह्यामध्येही पोलिसांना वॉन्टेड आहे. त्यामुळे गोट्याला अटक कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
ज्ञानोबा मारुती गीते असे गोट्या गीतेचे खरे नाव आहे. परळीतील नंदागौळ या गावचा तो रहिवासी असून सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर बीडसह इतर जिल्ह्यातही गुन्हे दाखल झाले आहेत. बीडमध्ये अनेकांना अग्निशस्त्र पुरवण्याचे काम देखील तो करत असल्याची चर्चा आहे.


COMMENTS