बीडः बीडमध्ये कोयता आणि सत्तुरने एका युवकाला धमकावून व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. संबंधित व्हिडिओ व्हायरल का केला? याचा जाब मारहाण झाले...
बीडः बीडमध्ये कोयता आणि सत्तुरने एका युवकाला धमकावून व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. संबंधित व्हिडिओ व्हायरल का केला? याचा जाब मारहाण झालेल्या युवकाने विचारल्याचा राग मनात धरून त्याच्या हाताचे बोटे छाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात समोर आला आहे.
याप्रकरणी चार जणांवर पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख अलीम अनिस याला चार जणांच्या टोळक्याने कोयता आणि सत्तुरने धमकावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. मुख्य आरोपी मारहाण झालेल्या युवकाचा मित्रच आहे. संबंधित व्हिडिओ इतर मित्रांना का दाखवतो? याचा जाब अनिसने विचारला असता त्याच्या मित्राने गाडीवर बसवून अज्ञात स्थळी नेत मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचे बोट छाटण्यात आले आहे. पीडित युवकाने दिलेल्या माहितीनुसार, ‘पंधरा दिवसांपूर्वी डोंगरावर नेत चार जणांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या हातात खंजीर होता. खंजराने मला मारायचे होते. व्हिडीओ केला आणि का मारलं म्हणून जाब विचारायला त्यांच्या घरी गेलो. त्यावेळी मासूम कॉलनीच्या आदिलने बाहेर नेत हात पकडला. शेहबाज नावाच्या दुसऱ्या युवकाने माझ्या हाताची बोटं तोडली. मी तिथेच पडल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी मला हॉस्पिटलमध्ये नेले. हाताची चार बोटं कातडीवर लटकली असून, दोन बोटांमध्ये रॉड टाकला आहे. मारहाण करताना तिथे चार लोक होते. व्हिडीओ काढणारा एक जण होता.’
दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये दोघांच्या हातात धारदार कोयते आणि सत्तुर असून, ते एका युवकाला धमकावत असल्याचे दिसत आहे. “आता तुझ्यावर वार करतो” असे म्हणत ते त्याच्यावर धावून जातात. काही क्षणांतच त्यांनी शेख अलीम अनिस या युवकावर हल्ला केला. असीमवर धारदार शस्त्राने वार झाल्याने त्याला टाके घालावे लागले असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. मित्रानेच मित्राचे बोटे छाटल्याने बीड मध्ये मात्र पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS