मुंबई: एका विमान कंपनीत काम करणाऱ्या युवकाने एअर होस्टेस युवतीवर लैंगिक अत्याचार केला आहे. अत्याचारानंतर आरोपी हाँगकाँगला पळून जात होता. मात...
मुंबई: एका विमान कंपनीत काम करणाऱ्या युवकाने एअर होस्टेस युवतीवर लैंगिक अत्याचार केला आहे. अत्याचारानंतर आरोपी हाँगकाँगला पळून जात होता. मात्र पोलिसांनी विमानतळावरून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
देवाशिष शर्मा (वय २५) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचेनाव आहे. तो एका विमान कंपनीत क्रू मेंबर म्हणून काम करतो. मीरा रोड येथील रहिवासी एअर होस्टेस (वय २३) त्याच विमान कंपनीत हवाई सुंदरी म्हणून काम करते. एका क्रू मेंबरने मीरा रोड येथील स्वतःच्या घरात सहकारी हवाई सुंदरीवर बलात्कार केल्याप्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
देवाशिष शर्मा हा मूळचा जयपूर (राजस्थान) येथील रहिवासी आहे. सध्या तो मीरा रोड येथेच रामदेव पार्कच्या पंचमरत्न परिसरात भाड्याने राहतो. २९ जून रोजी रात्री लंडन ते मुंबई या विमानात काम करून दोघे सोबत मुंबईत आले होते. यावेळी लंडनच्या एका मैत्रिणीसह तिघांनी मिळून मुंबईत पार्टी केली. रात्री उशीर झाल्याने शर्मा पीडित एअर होस्टेसला स्वतःच्या मीरा रोड येथील घरी घेऊन गेला. ३० जूनच्या पहाटे शर्मा याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले.
या घटनेनंतर शर्मा परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याने हाँगकाँग येथील विमान कंपनीत नोकरी देखी मिळवली होती. याप्रकरणी १८ जुलैच्या रात्री सव्वा अकराच्या सुमारास गुन्हा दाखल केल्यानंतर नवघर पोलिसांनी तत्काळ सहार विमानतळ पोलिसांशी संपर्क साधून १९ जुलैच्या मध्यरात्री शर्मा याला विमानतळावरच अटक केली. विशेष म्हणजे शर्मा याने आधीदेखील पीडितेला शारीरिक त्रास दिला होता. याबाबत पीडित युवतीने विमान कंपनीला ई-मेल करून तक्रार केली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS