ठाणे : आईने स्वतःच्या तीन मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्यामुळे मुलींना जेवणातून कीटकनाशक औषध देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना अस्नोली ...
ठाणे : आईने स्वतःच्या तीन मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्यामुळे मुलींना जेवणातून कीटकनाशक औषध देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना अस्नोली (ता. शहापूर) गावात घडली आहे. मृत मुलींची नावे काव्या संदीप भेरे (वय 10), दिव्या संदीप भेरे (वय 8) आणि गार्गी संदीप भेरे (वय 5) अशी आहेत.
तिघी अल्पवयीन मुलींना जेवणातून विषबाधा झाल्यानंतर प्रकृती खालावल्याने वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोन व घोटी येथील एस एम बी टी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले एक अशा तिन्ही मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये काही दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाल्याने संबंधित महिला तिच्या चेरपोली येथील सासरवाडीतून माहेरी अस्नोली येथे परतली होती. आर्थिक अडचण, मानसिक तणावामुळे नैराश्यातून तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी किन्हवली पोलिस ठाण्यात आईच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला अटक करण्यात आली आहे. किन्हवली पोलिस तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, एकाच वेळी तिन्ही बहिणींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमकी मुलींना विषबाधा झाली की दुसरे काही आहे, याबाबतचा तपास पोलिसांनी सुरु केला होता. दरम्यान, या तिन्ही मुलींच्या मृत्यूबाबत मुलींच्या आईची संशयास्पद भूमिका वाटत असल्याने पोलिसांनी आईला ताब्यात घेत तपास केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS