भंडारा: भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील एका डॉक्टरने उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या युवतीसोबत (वय १७) नको तेच कृत्य केले आहे. या प्रकरणी पीडि...
भंडारा: भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील एका डॉक्टरने उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या युवतीसोबत (वय १७) नको तेच कृत्य केले आहे. या प्रकरणी पीडित युवतीने साकोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
डॉ. देवेश अग्रवाल (वय ४५) असे गुन्हा दाखल डॉक्टरचे नाव आहे. साकोली येथे शाम हॉस्पिटल नावाचे त्यांचे रुग्णालय आहे. याच रुग्णालयात पीडित युवती आपल्या आईसोबत उपचारासाठी गेली होती. यावेळी आरोपीने पीडितेला अश्लील स्पर्श करून तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडित युवतीने आईसह तातडीने साकोली पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी डॉ. देवेश अग्रवाल याच्या विरुद्ध साकोली पोलिसात कलम ६४(२)(१),६५(१) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पीडित युवतीची प्रकृती बरी नसल्यानं ती आईसोबत डॉ. देवेश अग्रवाल यांच्या शाम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती. मात्र, डॉक्टरने सोनोग्राफी काढण्याच्या बहाण्याने युवतीला सोनोग्राफी रूममध्ये नेले. रुममध्ये कुणीही नसल्याचे पाहून आरोपीनं पीडितेला अश्लील स्पर्श करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी डॉ. अग्रवाल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच डॉक्टर फरार झालेला आहे. साकोली पोलिस डॉक्टरचा शोध घेत आहेत.


COMMENTS