प्रतिनिधी : सुरंजन काळे घोडेगाव : आंबेगाव तालुका केडर चे असणारे सचिव यांचा सेवपुर्ती समारंभ व सहाय्यक निबंध श्री सुर्यवंशी साहेब विभागीय अधि...
प्रतिनिधी : सुरंजन काळे
घोडेगाव : आंबेगाव तालुका केडर चे असणारे सचिव यांचा सेवपुर्ती समारंभ व सहाय्यक निबंध श्री सुर्यवंशी साहेब विभागीय अधिकारी श्री गायकवाड साहेब यांच्या उपस्थित पार पडला
आंबेगाव तालुका देखरेख संघ यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असणारे विविध कार्यकारी सोसायटीचे असणारे सचिव श्री बाळासाहेब टाव्हरे व विश्वास शिंदे यांचा वायाचा कार्यकाळ पूर्ण करून 31मे 2025 रोजी निवृत्त झाले आहेत त्यांच्या सत्कार आज तालुका देखरेख संघ व जिल्हा बँक आंबेगाव तालुका यांच्यातर्फे करण्यात आले.
बाळासाहेब टाव्हरे यांनी आपली सेवा पारेश्वर विकास संस्था पारगाव गाडदादेवी विकास संस्था पोंदेवडी या दोन विकास संस्थेचे काम निस्वार्थीपणे केले तसेच श्री विश्वास शिंदे यांनी कुरवंडी विकास सहकारी संस्था या संस्थेची सेवा गेली 30 ते 35 वर्ष निस्वार्थीपणे केली या दोन्ही सचिवांचा सत्कार जिल्हा बँक कडून तालुका देखरेख संघ व तालुक्यातील सर्व विकास सचिव तसेच विकास अधिकारी यांच्या उपस्थित पार पडला
आभार श्री थोरात साहेब यांनी मांडले
COMMENTS