राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे डाएट आयोजित झयत्ता पहिली नविन अभ्यासक्रम प्रशिक...
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे डाएट आयोजित झयत्ता पहिली नविन अभ्यासक्रम प्रशिक्षण अंतर्गत जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण सिंहगड इन्स्टिट्यूट skn कुसगाव लोणावळा ता मावळ पुणे येथे दि 30 मे ते १ जून रोजी पार पडले . या कालवधीत शिक्षक प्रशिक्षणार्थी कवी संपादक यशवंत घोडे सर जुन्नर .जि प . शाळा कुमशेत यांच्या "भावरंग बालमनाचे" बालगाणी बालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी मा .श्री .भाऊसाहेब कारेकर साहेब ,पुणे डाएटचे प्राचार्य मा . श्री नामदेव शेंडकर साहेब . पुणे डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता मा श्री . बाळकृष्ण वाटेकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी तज्ञ मार्गदर्शक वैशाली गाढवे मॅडम . मनिषा कुऱ्हाडे मॅडम . दिव्या भोसले मॅडम , नितिन मेमाने सर . हनुमंत जाधव सर तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तज्ञ मार्गदर्शक शिक्षक व प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते . सर्वांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या .
हा काव्यसंग्रह कवी संपादक मा .यशवंत घोडे सर यांनी संपादीत केला असून त्यांच्या जि प प्राथ.शाळा कुमशेत ता जुन्नर येथील इ १लीते ४थीच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेलया स्वरचित कविता आहेत
विद्यार्थ्याच्या नवनिर्मितीला चालणा देणाऱ्या आहेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातले भाव काव्यरूपी रेखाटले आहेत . त्यांचे ४ काव्यसंग्रह प्रकाशित असून तसेच पहिली ते तिसरी वर्गासाठी त्यांचा" अवतीभवती" हा बालकाव्यसंग्रह समग्र शिक्षा अभियान ग्रंथालय निर्मिती अंतर्गत राज्यशैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्रSCERT यांनी प्रकाशित केला असून महाराष्ट्र राज्यातील शासकीय' अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांमध्ये ग्रंथालयात पोहचत आहे . तसेच शिवजन्मभूमी जुन्नर येथील पाठयपुस्तक कवी साहित्यिक मा उत्तम सदाकाळ सर यांचीप्रस्तावना काव्यसंग्रहाला लाभली आहे . बालभारती पाठयपुस्तक संपादन मंडळ माजी सदस्य मा श्रीकांत चौघुले साहेबांनी प्रेरणादायी शुभेच्छा संदेश दिला आहे . सुप्रसिद्ध चित्रकार सुहास जगताप सर यांनी उत्कृष्ट चित्र रेखाटन केले आहे . साईराजे पब्लीकेशन पुणेचे प्रकाशक नक्षत्राचं देणं काव्यमंचचे राष्ट्रीय अध्यक्ष .कवी वादळकार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले . भावरंग बालमनाचे बालगाणी बालकाव्यसंग्रह बाल साहित्यिकांना भविष्यात नवी दिशा देणारा प्रेरणास्थान आहे .
COMMENTS