पुणे : प्रेयसीने घरी एकटी असताना आपल्या प्रियकराला घरी बोलावले आणि त्याचे हातपाय ओढणीने बांधून बेदम मारहाण केली. या घटनेत प्रियकराचा मृत्यू ...
पुणे : प्रेयसीने घरी एकटी असताना आपल्या प्रियकराला घरी बोलावले आणि त्याचे हातपाय ओढणीने बांधून बेदम मारहाण केली. या घटनेत प्रियकराचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी युवती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे. कमल रामदयाल मधुकर (वय 30, रा. पटेडीह, बिलासपूर, छत्तीसगड) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. संध्या सतीश पवार (वय 30, रा. इंदोरी, ता. मावळ, पुणे, मूळ रा. सातारा) असे आरोपी युवतीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत युवकाची बहीण अंकिता रामदयाल मधुकर (वय 20) हिने तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कमल आणि संध्या हे दोघेही मजुरीवर काम करत असताना त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. पण, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद वाढले होते. या वादातून संध्याच्या मनात राग आणि सूडाची भावना निर्माण झाली होती. तिने कमलला आपल्या घरात बोलावून घेतले. तो दारूच्या नशेत घरी आल्यानंतर, संध्याने त्याचे हातपाय ओढणीने बांधले. त्यानंतर घरात असलेल्या क्रिकेटच्या बॅटने तिने कमलच्या डोक्यावर वार केले. या गंभीर मारहाणीमुळे कमलचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, आरोपी संध्या पवार हिला अटक केली आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली. या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक पोलिस करत आहेत.
COMMENTS