कोल्हापूरः कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते येथे एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या करण्या...
कोल्हापूरः कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते येथे एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली आहे.
फैजान नाजिमा (वय 11) असे मृत मुलाचे नाव आहे. या संस्थेतील एका अल्पवयीन मुलानेच फैजानची हत्या केल्याचे उघड झाले आहे. संस्था बंद पडून आपल्याला घरी जायला मिळावे, यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्याने फैजानची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.
आळते येथे असणाऱ्या या धार्मिक शिक्षण संस्थेत 80 विद्यार्थी आहेत. यापैकी बहुतांश म्हणजे 70 विद्यार्थी हे बिहारमधील आहेत. हत्या झालेला फैजान नजीमा आणि हत्या करणारा हे दोघेही बिहारचे होते. हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याला बिहारमधील आपल्या गावी जायचे होते. त्यासाठी ही संस्था बंद पडावी, या उद्देशाने त्याने फैजानची शॉक देऊन हत्या केली. फैजानचा झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी संस्थेतील मुलांची चौकशी केली. त्यावेळी एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपणच फैजानला इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन त्याची हत्या केल्याची कबुली दिली.
दरम्यान, शिक्षण संस्था बंद पडून घरी जायला मिळावे म्हणून विद्यार्थ्यानेच विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या केल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS