प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे (बांगरवाडी) येथील विद्यार्थ्यांनी सी...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे (बांगरवाडी) येथील विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेत घवघवीत यश मिळविले असल्याची माहिती प्राचार्या वैशालीताई आहेर यांनी दिली.
आर्यन उदागे या विद्यार्थ्याने एमएच नर्सिंग-सीईटी २०२५ मध्ये ९७.६९ पर्सेंटाइल मिळविले.तसेच गीतांजली बांगर हिने ९६.४२ त्याचबरोबर सुमित निचित-९४.२८ पर्सेंटाईल,श्रावणी नरवडे -८७.१२ पर्सेंटाईल,अंकिता घंगाळे-८५.४७ पर्सेंटाईल,आकांक्षा आहेर-८५.१८ पर्सेंटाईल,संस्कृती हुलवळे-८३.३५ पर्सेंटाईल आणि साक्षी पुंडे-८१.६१ पर्सेंटाईल मिळवून विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
ग्रामीण भागातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी सीईटीचे वर्ग उपलब्ध करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी यासाठी समर्थ शैक्षणिक संकुल नेहमीच अग्रेसर असते.इयत्ता ११ वी पासून दोन वर्ष सीईटी परीक्षेची तयारी करून घेतली जाते.शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे समर्थ ज्युनिअरच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या सीईटी-नर्सिंग परीक्षेमध्ये लक्षणीय यश मिळवले आहे.हे यश विद्यार्थ्यांची मेहनत,शिक्षकांचे कष्ट,उत्तम अनुभवसमृद्ध अध्यापन,निरंतर सराव,पालकांची साथ,उत्कृष्ट वार्षिक नियोजन ह्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाचे आहे.विविध सी ई टी परीक्षामध्ये दरवर्षी समर्थ जुनिअर कॉलेजचे विद्यार्थी नेत्रदीपक यश मिळवत असतात व हेच कॉलेजच्या गुणवत्तेचे द्योतक असल्याचे सचिव विवेक शेळके यांनी सांगितले.
यावेळी पालक व यशस्वी विद्यार्थी यांचा सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मान करण्यात आला.पालक व विद्यार्थी यांनी कॉलेज,शिक्षक यांच्याविषयी मनोगतनातून कृतज्ञता प्रकट केली.
या विद्यार्थ्यांना प्रा.संतोष पोटे,प्रा.राजेंद्र नवले,प्रा.विनोद चौधरी,प्रा.अमोल खामकर,प्रा.संगीता रिठे,प्रा.रोहिणी औटी,प्रा.नूतन पोखरकर,प्रा.ऋतुजा थोरात,प्रा.श्वेता जाधव,प्रा.वैशाली ढाकोळ,प्रा.सोनल कोरडे,प्रा.सुरेखा पटाडे,प्रा.राहुल वाळुंज,प्रा.प्रतिमा आवटे,प्रा.नेहा बुगदे,प्रा.दिपाली भोर,प्रा.वंदना गोरडे,प्रा.सायली भोर,प्रा.सायली नवले,प्रा.अक्षता मोरडे,प्रा.स्वप्नील दाते,प्रा.संपत जाधव,प्रा.स्वाती खोडदे,प्रा.मुराद शेख यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच सर्व विभागाचे प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS