लंडन: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. भारताबरोबरच परदेशातही याचे पडसाद उमटत आहेत. ...
लंडन: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. भारताबरोबरच परदेशातही याचे पडसाद उमटत आहेत. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्त भारतीय विद्यार्थ्यांनी लंडनमध्ये पाकिस्तानी दूतावासासमोर देखील आंदोलन केले आहे.
यापाकिस्तानी डिप्लोमॅटच्या कृत्यानं संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. विद्यार्थी आंदोलन करत असताना पाकिस्तानी कर्नल तैमूर यांनी बाल्कनीत उभे राहून भारतीय आंदोलकांकडे पाहून थेट आपल्या गळ्यावरून अंगठा फिरवत, गळा कापू अशा प्रकारचा इशारा केला आहे. या कृत्यातून कर्नल तैमूर यांनी भारतीय आंदोलकांना डिवचण्यचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार आंदोलकांच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे.
संबंधित व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. तैमूर यांच्या हातात यावेळी भारतीय लष्करी अधिकारी अभिनंदन यांचा फोटो असणारे पोस्टरही पाहायला मिळाले. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
लंडनमध्ये पाकिस्तानी दूतावासाबाहेर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने भारतीय नागरिकांनी हातात निषेधाचे फलक आणि राष्ट्रध्वज घेत निषेध व्यक्त केला. यावेळी पाकिस्तानी अधिकाऱ्याची ही कृती टीकेची धनी ठरली आहे.
COMMENTS