Latur News : मी आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावे, अशी समाजाची इच्छा आहे. माझी तयारी आहे. बाबासाहेबांचा पक्ष बाळासाहेबांनी चालवावा. त्यांची ...
Latur News : मी आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावे, अशी समाजाची इच्छा आहे. माझी तयारी आहे. बाबासाहेबांचा पक्ष बाळासाहेबांनी चालवावा. त्यांची वंचित बहुजन आघाडी बंद करुन या पक्षात यावे.
मंत्रीपद सुद्धा त्यांनी घ्यावे मी पक्षाचे काम करेन, अशी साद केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) चे रामदास आठवले यांनी घातली. प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे पुन्हा एकदा आठवले यांनी ऐक्यासाठी पुढाकार घेतला आहे.
लातूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी ऐक्यावर भाष्य केले. रिपब्लिकन पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष आहे. सध्या मी या पक्षाचा अध्यक्ष आहे, पक्ष देशभर विस्तारत आहे. पण अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) व मी एकत्र यावे तर ऐक्य होईल, अशी समाजाची अपेक्षा आहे. माझी तयारी आहे, बाबासाहेबांचा पक्ष बाळासाहेबांनी चालवावा, असे आठवले म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बंद करुन या पक्षात यावे. माझे मंत्रीपद सुद्धा त्यांनी घ्यावे मी पक्षाचे काम करेन, असेही आठवले म्हणाले.
COMMENTS