प्रतिनिधी : सुरंजन काळे आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या ५ मार्च २०२५ ते ४ मार्च २०३० साठीचे सरपंच आरक्षण आंबेगाव पंचायत समिती कार्यालय...
प्रतिनिधी : सुरंजन काळे
आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या ५ मार्च २०२५ ते ४ मार्च २०३० साठीचे सरपंच आरक्षण आंबेगाव पंचायत समिती कार्यालय घोडेगाव तहसिलदार संजय नागटिळक यांनी आरक्षण सोडत घेतली.
गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, नायब तहसिलदार सचिन वाघ, जयश्री भवारी दामोधर टेमगिरे, किशोर हुल्लारे आदिंसह विविध गावांतील सरपंच पदाचे इच्छुक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीथांश भुषण वाणी व आदित्य विश्वनाथ वाणी या दोन मुलांच्या हस्ते चिठ्ठया काढण्यात आल्या. यावेळी अनेक इच्छुकांना या आरक्षणाचा फटका बसला तर अनेक इच्छुक नव्या आरक्षण सोडतीमुळे जल्लोषात कामाला लागले.या आरक्षण सोडतीमध्ये
अनुसूचित जमाती स्त्री चिखली, साल, बोरघर, गोहे बु.फलोदे, पाटण, सुपेधर, महाळुंगे मोठा घोडा, फुलवडे, डिंभ बु., पोखरी, राजपुर, ढाकाळे, आसाणे, तिरपाड, शिनोली, माळीण, उगलेवाडी. फदालेवाडी
अनुसूचित जमाती पिंपरगणे, कुशिरे बु., कोलतावडे, आहुपे, जांभोरी, तळेघर, कानसे, गोहे खुर्द, डिंभे खुर्द, आंबेदरा, आमोंडी, गंगापुर खुर्द, पंचाळे बु., चपटेवाडी, राजेवाडी, पिंपळगाव तर्फे घोडा, गंगापुर बु., कोंढवळ,
सर्वसाधारण स्त्री पहाडदरा, लांडेवाडी --पिंगळवाडी, कोलदरा - गोनवडी, तळेकरवाडी, निघोटवाडी, नागापुर, भागडी, खडकी, वडगांव काशिंबेग, पेठ, चांडोली खुर्द, शिंगवे, शेंवाळवाडी, भराडी, अवसरी खुर्द, गावडेवाडी, पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे, साकोरे, रानमळा, थोरांदळे, चिंचोडी
सर्वसाधारण - पोंदेवाडी, देवगाव, कुरवंडी, वडगावपीर, विठ्ठलवाडी, वाळुंजनगर, कळंब, धोंडमाळ शिंदेवाडी, जवळे, पारगाव तर्फ खेड, चास, नारोडी, थुगांव, जारकरवाडी, गिरवली, चिंचोली, मांदळेवाडी, खडकवाडी, कारेगांव.
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री अवस्री बु. ठाकरवाडी, जाधववाडी, काठापूर बु., चांडोली बु., कौळ्याडी कोटमदरा, मेंगडेवाडी, लोणी, निरगुडसर. -
नागरिकांचा मागास प्रवर्ग लाखणगांव, टाकेवाडी, काळेवाडी - दरेकरवाडी, म्हाळुंगे पडवळ, घोडेगांव, एकलहरे, धामणीतांबडेमळा, शिरदाळे.
अनुसूचित जाती स्त्री नांदूर, आंबेगाव गावठाण. -
अनुसूचित जमाती स्त्री वाळुंजवाडी, वळती, रांजणी. -
अनुसूचित जमाती भावडी, पारगांव तर्फे अवसरी बु.
अनुसूचित जाती - लौकी दरम्यान यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ६७ ग्रामपंचायतींपैकी लाखणगाव, पोंदेवाडी, कुरवंडी, देवगाव, वडगाव पीर, विठ्ठलवाडी या ६ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत २७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे काढण्यात आलेली होती.
COMMENTS