बीड: चिकन विक्रीच्या वादातून अल्पवयीन मुलाला उचलून सिमेंटच्या नाल्यावर आदळल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केज शहरात घडल...
बीड: चिकन विक्रीच्या वादातून अल्पवयीन मुलाला उचलून सिमेंटच्या नाल्यावर आदळल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केज शहरात घडली आहे. रेहान कुरेशी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून, या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन आरोपीचा शोध घेतला जात आहे.
एका अल्पवयीन मुलाला चिकन विक्रीच्या वादातून त्याच्याच शेजारी चिकन विक्रीचे दुकान असलेल्या अल्पवयीन मुलाने उचलून सिमेंटच्या नाल्यावर आदळल्याने रेहान कुरेशी याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अल्पवयीन आरोपीचा शोध केज पोलिस घेत आहेत.
केज शहरात चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. रेहान कुरेशी नावाच्या अल्पवयीन मुलाचे दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाशी वाद झाला. हा वाद वाढत गेला आणि आरोपीने रागाच्या भरात रेहानला उचलून थेट सिमेंटच्या नाल्यावर आपटले. डोक्याला गंभीर मार लागल्याने रेहानचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS