शिवांजली सहित्यपीठ महाराष्ट्र साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था चाळक वाडी आयोजित मराठी राजभाषा दिन अभिजात मराठी भाषा...
शिवांजली सहित्यपीठ महाराष्ट्र साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था चाळक वाडी आयोजित मराठी राजभाषा दिन अभिजात मराठी भाषा गौरवार्थ ३२ वा राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सव २०२५ या संमेलन मध्ये दिनांक २ मार्च२०२३ रोजी रहस्यकवी सौरभ नवले यांना शिवांजली सहित्यपीठ चा "नवोन्मेश भुमिपुत्र साहित्य पुरस्कार २०२५". ज्येष्ठ साहित्यिक मा.रा.लामखडे यांच्या हस्ते चाळकवाडी जुन्नर येथे प्रदान करण्यात आला. यावेळी, शिवांजली परिवाराचे संस्थापक शिवाजीराव चाळक साहेब,प्रा संदिप वाघोले सर, रणजित पवार सर,हे उपस्थित होते या पुरस्काराने सौरभ नवले यांच्या जीवनाला एक नवी कलाटणी मिळणार आहे
या यशाचे श्रेय सौरभ नवले यांनी आपले आई वडिल, पत्नी पौर्णिमा, मार्गदर्शक शिवाजीराव चाळक साहेब, प्रा संदिप वाघोले सर रणजित पवार सर, आणि सर्व शिक्षक आणि मित्रपरिवार यांना दिले
आपल्या लेखनाने आणि समाज कार्याने अवघ्या महाराष्ट्रात ख्याती मिळवणारे
प्रा.सौरभ चंद्रकांत नवले हे
रहस्यकवी या नावाने ओळखले जातात ते कला संस्कृती ज्ञान संगम मंच, मनश्री फाउंडेशन चे संस्थापक असुन त्यांच्याकडे खालील प्रमाणे अनेक संस्थांची विविध पदे आहेत ते डेबुजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य चे पुणे जिल्ह्याचे
जिल्हा प्रवक्ते तर काव्य प्रेमी शिक्षक मंच पुणे जिल्हा चे सचिव आहेत.ते जुन्नर तालुक्यातील
आंबेगव्हाण येथून असून त्यांचे शिक्षण एम. इ.डिझाईन इन मेकॅनिकल एम बी ए च्या शेवटच्या वर्षात शिकत असून त्यांनी मराठी,हिंदी,इंग्रजी भाषेत कविता ,शेर, गीत लेखन, शायरी,चारोळी,व्याख्यान लेखण,कथालेखन,कादंबरी लेखन,चित्रकला,नाटक लेखन,अभिनय,गायण,सह्याद्री च्या डोंगराची भ्रमांती,विविध कार्यक्रम नियोजन,सुत्रसंचलन,फोटोग्राफि,शाॅर्टफिल्म मेकिंग, या आपल्या आवडी जपत त्यांनी सामाजिक कार्यात आपला वेगळा ठसा उमटविला आहे ते सुप्रसिद्ध कादंबरी
"का गुंतला माझा जीव तुझ्यात?"
चे लेखक असून
हा पुरस्कार सौरभ नवले यांच्या व्यक्तीमत्त्वालां अजुन उभारी देईल अशी अशा या पुरस्काराचे आयोजक शिवाजीराव चाळक यांनी व्यक्त केली..
COMMENTS