प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते आंबे...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते आंबेगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या व उबाठा गटाच्या मा. आंबेगाव तालुका संघटिका प्रा.सौ.सुरेखाताई अनिल निघोट यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेना पक्षात नारायणगाव येथे झालेल्या विराट जाहीर सभेत प्रवेश केला.
यावेळी किल्ले शिवनेरी जुन्नरचे आमदार मा.शरददादा सोनवणे, शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद, शिवसेना नेते रामभाऊ रेपाळे, शिवसेना शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख विकासभाऊ रेपाळे, युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रविण थोरात पाटील, युवासेना तालुकाप्रमुख वैभव पोखरकर यांच्यासह आंबेगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
प्रा.सौ.सुरेखाताई निघोट यांनी बोलताना, आंबेगाव तालुक्याच्या गावागावात महिलांचे प्रभावी संघटन उभे करून नुकतीच विधानसभा निवडणूक देखील लढविली होती. माझ्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे आंबेगाव तालुक्यात शिवसेनेची महिला आघाडी भक्कम होणार असल्याने शिवसैनिकांनीही या भूमिकेचे स्वागत केले आहे.
ईतर पक्षातील बंडखोर आशाताई बुचके, संजय भेगडे त्याच पक्षात मानाच्या पदांवर विराजमान असुन, शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नव्वद टक्के पदं भरायची बाकी असली तरी महिला तालुका संघटिका पदावर दसर्याची नेमणूक करताना ज्या शिवसेनेसाठी पक्षफुटीनंतर वेळ देऊन पाटण ते रांजणगाव पर्यंत आंबेगाव शिरुर मतदारसंघातील संपूर्ण महिला आघाडी पदाधिकारी नेमणुक करुन यादी संपर्कप्रमुखांना दिली गावोगाव ,शिवसैनिकांना विश्श्वासात घेत, बैठका घेत त्यांना बरोबर घेत शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाव बैलगाडा शर्यत,यात्रा,हरिनाम सप्ताह, लग्न, वाढदिवस अशा विविध ठिकाणी भाषण मनोगतातुन सर्वदूर पोहोचवले ,पण एवढं काम करून ईतर पदाधिकारींवर वरीष्ठांकडुन या महिला आघाडी तालुकाप्रमुख म्हणून एवढं प्रभावी काम करतात, तुमचं काम, पक्षसंघटना नेमणूका दिसत नाही अशी कानऊघाडणी केल्यानं पक्षासाठी समाजाच्या अडचणी सोडवण्यास रात्रंदिवस काम करत असलेल्या माझा द्वेष दुस्वास सुरु केला.वास्तविक जिकडे दौरा असेल तिथल्या महिला आघाडी,शिवसैनिकांना संपर्क करुनच बैठका,नेमणूका करुन,वर ईकडचे पदाधिकारी नेमा सांगुनही ज्यांना पदे देऊनही वर्षभर गावातील महिला आघाडी संघटिका नेमता आली नाही अशांना घेऊन संपर्कप्रमुखांकडे पुरुष आघाडीचे पदाधिकारीशिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व आघाड्यात ढवळाढवळ करुन संपर्कप्रमुखांकडे असलेल्या वशिल्याचा वापर करत तक्रारी करुन तक्रारदारा़चीच मातोश्री,शिवसेनाभवनात. नेऊन नेमणूक करुन आणली ,तेच महिला आघाडी जिल्हाप्रमुख नेमतानाही, धडाडीच्या महिला नेत्या विजयाताई शिंदे यांच्या महिला आघाडी पदाधिकारींना विश्वासात घेतले नाही, पुरुष आघाडीने आपल्या पक्षसंघटनेकडे लक्ष दयावे,महिला आघाडीत लक्ष घालु नये ही संपर्कनेत्यांची तंबी ही कामाला आली नाह खरंतर ,शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुकाप्रमुख म्हणून समाजाच्या प्रश्नावर कुणाशीही भिडुन अन्याय झालेल्यांस न्याय देणारी रणरागीणी, झंझावाती आक्रमक नेत्रुत्व म्हणून सुरेखाताई निघोट यांची अल्पावधीत संपुर्ण आंबेगाव शिरुर मतदारसंघात झाली,त्यात संपर्कप्रमुखांकडे मागणी करून अनेक महिला व शिवसैनिकांसह मातोश्रीवर दोनतीन वेळा जाऊनही आत निरोप पाठवुनही ऊद्धवजींचा भेटीस निरोप न आल्याने शिवसैनिक,महिला आघाडी चे शिवसैनिक हिरमुसले,त्यातच शिवसेनेने लढलेल्या पुणे जिल्हयातील सर्व जागा राष्ट्रवादीला दिल्याने शिवसेनेच्या अस्तित्वासाठी, शिवसैनिकांच्या स्वाभिमानासाठी मी प्रा.सुरेखाताई निघोट आंबेगाव शिरुर विधानसभेच्या मैदानात भगवा खांद्यावर घेऊन उतरल्यावर झंझावाती प्रचारदौरा करुन आपली भुमिका मांडत निवडणुक लढवली,पक्षाने कारवाई केली पण तीस वर्ष हाडाचे शिवसैनिक असल्याने, पदरपैशाने पक्षासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम घेत गावोगावी घरोघरी शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पोहोचवणारांचं काम पक्षप्रमुख ऊद्धवसाहेबांपर्यरंत पोहोचत नसेल, मातोश्रीवर जाऊनही भेट न होता परत यावं लागत असेल, अन ईतर पक्षातील बंडखोर त्याच पक्षात परत सक्रिय होऊन मानाचं पद भुषवत आहेत. पण एकनिष्ठ शिवसैनिकांना जर पक्षसंघटनेत पदरपैशाने विविध सामाजिक उपक्रम, कार्यक्रम, स्पर्धा, गुणगौरव, सत्कार, पुरस्कार घेऊन पक्षवाढीसाठी लाखो रुपये खर्च करूनही,पक्षात मानसन्मान मिळत नसेल, पक्षाला किंमत नसेल ,याआधीही बंडखोरी करणारांची हकालपट्टी झाली,पण पक्षफुटीनंतर त्यांचा प्रवेश कधी झाला हे कुणाला कळलंही नसताना ते तालुका जिल्हा पातळीवर प्रमुख पदं भुषवुन जवळच्यांना पदाधिकारी बनवून शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपली खाजगी मालमत्ता म्हणून वागत असले व त्यांच्या तक्रारी मात्र संपर्कप्रमुखांकडेच जिरल्या जाऊन पक्षप्रमुखांपर्यंत कटटर शिवसैनिकांचा आवाज पोहोत नाही, पक्षाचा तळागाळातील शिवसैनिकांशी सुसंवाद न राहिल्याने,ईतर पक्षातुन आलेले तीन तीन वर्ष पक्षसंघटनेचं काम न करता केवळ संपर्कप्रमुखांना खुश ठेवुन पदांवर कायम असताना मुळ शिवसैनिक मात्र बाजूला जात आहेत, अलिप्त होत आहेत.त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन काम करणारांनाच पाण्यात पाहिलं जा असेल तर ईतर पक्षात न जाता भगवा कायमच ठेवत मी स्वाभिमानी मराठा महासंघ प.महाराष्ट्र संपर्कप्रमुख म्हणून काम चालू ठेवले,पण पक्षासशिवसेनेसाठी झिझलेल्यांची गरज , किंमत नसल्याने शिवसेना पक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ऊपस्थितीत प्रवेश करावा लागला,शिवसेनेचा झंझावात संपुर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात निर्माण करुन लवकरच भव्य मेळावा घेऊन शिवसैनिक पदाधिकारी मुळ शिवसेनेत सन्मानाने आणत पुन्हा शिरुर लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार प्रा सुरेखाताई निघोट यांनी व्यक्त केला.
COMMENTS