प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर भारतातील थोर सुफी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज आणि जुन्नर शहरातील सुफी संत हजरत सय्यदना इसहाकशाह कादरी यांच्...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
भारतातील थोर सुफी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज आणि जुन्नर शहरातील सुफी संत हजरत सय्यदना इसहाकशाह कादरी यांच्या उर्स निमित्ताने उम्मत की खिदमत फाउंडेशन,साद सोशल फाउंडेशन पुणे,डॉ. पंजाबराव कथे फाउंडेशन, मोहन ठुसे नेत्र रुग्णालय व संशोधन संस्था नारायणगाव, यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील सर्व नागरिकांसाठी भव्य जन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याची माहिती शिबिराचे प्रमुख संयोजक हाजी गुलाम नवी शेख व वाजिद इनामदार यांनी दिली.
शिबिराचे उद्घाटन सुफी सांप्रदायाचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक व व्याख्याते हजरत आतिफमिया कादरी तसेच कामगार नेते इरफान सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अंजुमन इत्तेहादो तरक्की ट्रस्टचे अध्यक्ष शकील शेख,सचिव अनिस पटेल डॉ.पंजाबराव कथे,डॉ.पिंकी कथे,डॉ.कुमेल सय्यद,
डॉ.नुमैर फरहान, डॉ.अभिजित घंगाळे,डॉ.इमरान शेख,डॉ.शोएब इनामदार,सईद बेग,उद्योजक शरीफ कागदी,हाजी ईस्माईल खान,मोबीन शेख,फकीर आतार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरामध्ये कर्करोग,हृदयरोग,नेत्र मोतीबिंदू तपासणी,दंतरोग चिकित्सा,स्त्रीरोग,बालरोग, त्वचारोग, नाक कान घसा तपासणी तसेच जनरल सर्जरी,महिलांसाठी मोफत कर्करोग स्क्रीनिंग टेस्ट आयोजित करण्यात आली होती.
या शिबिरामध्ये सुमारे पंधराशे रुग्णांची तपासणी केली गेली. यामध्ये विद्यार्थी,शिक्षक,ज्येष्ठ नागरिक,महिला व युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या रुग्णांना शासनाच्या विविध योजनांमधून तसेच काही शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत तसेच आवश्यक सर्व आरोग्य विषयक चाचण्या ५० % दरामध्ये *उम्मत की खिदमत फाउंडेशन*च्या वतीने केल्या जातील असे हाजी गुलाम नबीशेख यांनी सांगितले.
शिबिरामध्ये टी.जी.एच.ओंको लाइफ कॅन्सर सेंटर तळेगाव दाभाडे,मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर,यशवंतराव चव्हाण रुग्णालय जुन्नर, लोकमान्य हॉस्पिटल मंचर,जीवन ज्योती डेंटल हॉस्पिटल नारायणगाव,डॉ. मते हॉस्पिटल नारायणगाव, पद्मश्री डॉ.मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव,जीवन हॉस्पिटल नारायणगाव, कोकाटे हॉस्पिटल जुन्नर,इनामदार हॉस्पिटल जुन्नर या सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन उत्तम आरोग्य सेवा देत शिबिर यशस्वी केले तसेच शिबिर संयोजन कामी अंजुमन हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षक विद्यार्थ्यांसह जुन्नर शहरातील विविध युवक संघटनांनी विशेष सहकार्य केले.या सर्वांना आयोजकांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
शिबिराचे सूत्रसंचालन हाफिज रिजवान,प्रा.साजिद खान, प्रा.मेहबूब काझी यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रा. अल्ताफ इनामदार यांनी मानले. शिबिर अत्यंत उत्साहात व यशस्वीपणे पार पडले.
COMMENTS