अवसरीचे खुर्द चे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज आणि कान्हुर मेसाई ची नवसाला पावणारी मेसाई मातेच्या चरणी श्री भिकाजी श्रीपती हुले मा सरपंच...
अवसरीचे खुर्द चे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज आणि कान्हुर मेसाई ची नवसाला पावणारी मेसाई मातेच्या चरणी श्री भिकाजी श्रीपती हुले मा सरपंच नारोडी तसेच ज्येष्ठ शिवसैनिक गुलाब शिंदे ,कारसेवक शिवसैनिक ज्ञानेश्वर पडवळ, अक्षय चौधरी,शिवराज चोधरी,सुरेश तांबे यांचे शुभहस्ते नारळ फोडून शिवसैनिक पण अंगठी चिन्हावर लढत असलेल्या अपक्ष प्रा सुरेखाताई अनिल निघोट प्रचाररथाचा शुभारंभ केला.
यावेळी सुरेखाताई निघोट यांनी संपुर्ण आंबेगाव तालुक्यात शिवसेना महिला संघटिका म्हणून गावोगाव फिरुन विविध कार्यक्रम, उपक्रम सत्कार आयोजित करुन ,यात्रा ऊत्सवांना भेटी, वारंवार गावाशी संपर्क ठेवतात , सामान्य माणसांसाठी रात्री अपरात्री कधीही फोन आला तरी मदतीस धावून येत आहेत,त्यामुळे त्यांना विजयासाठी नक्की च अंगठी चिन्हावर मतदान करून हातभार लावु अशी ग्वाही उपस्थित ग्रामस्थांनी दिली.
यावेळी सुरेखाताई निघोट यांनी प्रत्यक्ष अवसरी आमचे सर्वात जास्त नातेवाईक असलेले गाव असून सर्वांनी आपल्या सामान्य घरातील ऊमेदवार म्हणून अंगठी चिन्हावर मतदान करावे असे आवाहन केले.
यावेळी त्यांच्यासमवेत गुलाब शिंदे, अनिल शिंदे, सोपान शिंदे, ,ज्ञानेश्वर पडवळ, नामदेव कराळे, किसन शिंदे,बबन भोर सुरेश तांबे,युवा नेत्रुत्व अक्षय चौधरी व अवसरी खुर्द आणि कान्हर मेसाईचे ग्रामस्थ उपस्थित होते
COMMENTS