महाळुंगे पडवळ दि ७ नोव्हेंबर शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका संघटिका म्हणून काम पाहिलेल्या स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पश्च...
महाळुंगे पडवळ दि ७ नोव्हेंबर
शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका संघटिका म्हणून काम पाहिलेल्या स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख शिवसैनिक पण अंगठी चिन्हावर आंबेगाव विधानसभा लढवत असलेल्या अपक्ष ऊमेदवार प्रा.सुरेखाताई अनिल निघोट यांनी आज हुतात्मा बाबु गेनु यांच्या पुतळयाला अभिवादन करत महाळुंगे पडवळ येथे प्रचारास सुरुवात केली, येथील दुध डेअरीतील गवळयांना, ठाकरवस्तीस भेट देऊन सामान्य माणसाचा ऊमेदवार म्हणून अंगठी चिन्हावर मत देऊन विजयी करण्याचे आवाहन केले
यावेळी त्यांनी माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंगजी बनकर, शाखाप्रमुख अप्पा आवटे, सामाजिक कार्यरकर्ते बाबाजी चासकर, युवासेनेचे राहुल पडवळ यांच्याशी भेट घेऊन आपली भुमिका मांडली.
विशेष म्हणजे या वर्षात अनेक वेळा महाळुंगे पडवळ गावास भेटी देउन, सतत संपर्क ठेवुन ,समस्या सोडवणारी व्यक्ती म्हणून ठाकरवाडीतील आदिवासी ठाकर समाजाने सुरेखाताई अनिल निघोट यांना पाठिंबा जाहीर करुन धनशक्ती विरुद्ध जनशक्ती च्या लढयात सुरेखाताई निघोट यांच्या अंगठी चिन्हावर मत देऊन त्यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर पडवळ, ग्रा.पं.सदस्य अनिल पडवळ, अरुण आवटे, सीमा शेवाळे, संतोष आंबटकर, गणेश आवटे, मारुती जाधव, रंजना काळे, भरत जाधव, बाळु पारधी, लक्ष्मण जाधव, करण काळे ,ठकुबाई पारधी,फौजी चासकर हे शिवसैनिक बरोबर होते.
COMMENTS