कवठे यमाई दि१६ नोव्हेंबर आज शिवसैनिक,शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख म्हणुन काम पाहिलेल्या शिवसैनिक अंगठी...
कवठे यमाई दि१६ नोव्हेंबर
आज शिवसैनिक,शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख म्हणुन काम पाहिलेल्या शिवसैनिक अंगठी चिन्हावर अपक्ष ऊमेदवार प्रा सुरेखाताई अनिल निघोट यांनी कवठेयमाई , मुंजाळवाडी मलठण येथे शिवसैनिक, सामान्य मतदारांच्या भेटी घेऊन अंगठी चिन्हावर मतदान करुन आंबेगाव विधानसभेवर शिवसैनिकाचा भगवा फडकवण्याचे आवाहन केले, उपस्थित ग्रामस्थ, यात्रेकरूंनी सुरेखाताई निघोट सामान्य कष्टकरी कुटुंबातील महिला शिवसेनेच्या स्वाभिमानासाठी लढतेय त्यांचा आम्हाला अभिमान असून अंगठा चिन्हावर मतदान करुन सुरेखाताईंनाच विजयी करु अशी ग्वाही यावेळी मुंजाळवाडी यात्रा कमीटीने स्वागत सत्कार केल्यानंतर सुरेखाताई निघोट यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
कवठे यामाई चे माजी सरपंच भाऊसाहेब थोरात यांनी सुरेखाताई निघोट यांचा सन्मान केला, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या अनेक शिवसैनिकांनी अंगठी चिन्हावर मतदान करुन सुरेखाताई निघोट यांनाच विजयी करणार कारण समोरचे दोन्ही ऊमेदवार निवडून आले की कोणत्या तरी पवारांकडे जाणार पण सुरेखाताई निघोट आंबेगाव विधानसभेवर भगवा फडकवुन मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी हा विजय अर्पण करणार! यावेळी कवठयाचे कैलास बच्चे,सुनिल केदारे,अनिल रायकर, दतात्रय रोहिले, बाळासाहेब डांगे,भाऊ कांदळकर,अशोक गाडेकर,मुंजाळवाडी चे सरपंच किसन हिलाळ,विठ्ठल मुंजाळ,सुधिर रोहिले, रमेशभाऊ हिलाळ,गणेश हहिलाळतर मलठणचे दत्ता शिंदे,विकास देशमुख, धोंडीभाऊ शिंदे,म्हसकु थोरात, बिरा शिंदे,संपत शिंदे सोनेसा़गवीचे सुभाष शेळके, किसन शेळके, आण्णा डांगे उपस्थित होते.
रांजणगाव गणपती येथे माजी सरपंच संपतराव खेडकर व सर्जेराव खेडकर यांनी सुरेखाताई निघोट यांचा घरी बोलावून सन्मान केला.
COMMENTS