प्रा सुरेखाताई निघोट यांचे खडकी बैलगाडा यात्रेत स्वागत ,सुरेखाताईंनी रसवंती ग्रहात ऊसाचा रस काढुन आपल्या पारंपरिक निघोट रसवंती ची दिली बैलगा...
प्रा सुरेखाताई निघोट यांचे खडकी बैलगाडा यात्रेत स्वागत ,सुरेखाताईंनी रसवंती ग्रहात ऊसाचा रस काढुन आपल्या पारंपरिक निघोट रसवंती ची दिली बैलगाडा शौकीनांना आठवण करुन, सर्वसामान्य घरातील मंचरचा ढाण्या वाघ नारायणशेठ निघोट यांची सुनबाई शोभणारी शिवसैनिक, शिवसेनेची रणरागीणी सुरेखाताई अनिल निघोट तीस वर्ष शिवसेनेचं काम करुनही पुणे जिल्हयात सगळयाच जागा राष्ट्रवादीला दिल्याने शिवसैनिकांनी ज्यांनी शिवसेनेला त्रास,छळ करुन शिवसेनेचे बोर्ड तोडले , फाटाफुट केली, कामावरून काढुन टाकले, खटले दाखल करुन सरकारी यंत्रणांकडुन अरेरावी केली हे काहींचं भागल्यामुळे ,शिवसेनेला विकुन पोट भरल्यामुळे त्यांना कोणतीही राष्ट्रवादी चालेल पण अन्याय सहन करुन शिवसेनेसाठी अहोरात्र काम करणारा शिवसैनिक सुरेखाताई निघोट यांनी जी हिंमत दाखवली, जी शिवसेनेच्या नावावर कमावलेल्यांना दाखवता आली नाही त्यामुळे शिवसैनिक झुंजार, लढाऊ खरी शिवसैनिक पण अपक्ष अंगठी चिन्हावर लढत असलेल्या सुरेखाताई अनिल निघोट यांच्या मागे ठाम ऊभे आहेत.
आज खडकी येथील बैलगाडा घाटात बेलगाडामालक शौकीन ,ग्रामस्थांनी सुरेखाताई निघोट यांचे वाजत गाजत स्वागत करुन त्यांना विजयी करण्याची,अंगठी ला मतदान करण्याची ग्वाही दिली. यावेळी खडकी ग्रामस्थांनी सुरेखाताई निघोट यांचा सत्कार केला,घाटातील वाजंत्री मंडळी,दुकानदार व बैलगाडामालकंनी प्रत्येक घाटात रसवंती गृह चालवुन कष्टाने ऊच्चशिक्षित होऊन मुलांना पण डाक्टर बनवणारे प्रामाणिक कुटुंब म्हणून ओळखले जाणारे प्रा अनिल निघोट सरांच्या पत्नी म्हणून सुरेखाताई निघोट यांना सर्वांनी मागे ऊभं राहुन अंगठी चिन्हावर विजयी करु अशी ग्वाही दिली.
COMMENTS