पाबळ पट्ट्यात शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या कट्टर निष्ठावंत एकनिष्ठ शिवसैनिकांकडुन शिवसेनेच्या अस्तीत्वासाठी व शिवसैनिकांच्या स...
पाबळ पट्ट्यात शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या कट्टर निष्ठावंत एकनिष्ठ शिवसैनिकांकडुन शिवसेनेच्या अस्तीत्वासाठी व शिवसैनिकांच्या सन्मानासाठी आंबेगाव विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष अंगठी चिन्हावर शिवसैनिक प्रा.सुरेखाताई अनिल निघोट सामान्य शिवसैनिकांच्या मागणीनुसार मैदानात ऊतरल्या असुन आज मेंगडेवाडी ,निरगुडसर, पारगाव, जारकरवाडी, लोणी ,धामणी ,पाबळ गावांमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांकडुन सुरेखाताईंचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी निरगुडसरचे माजी सरपंच नारायण टाव्हरे, जिल्हा परिषद माजी परीषद माजी अध्यक्ष शैलजाताई ढोबळे, काठापुर चे माजी सरपंच बाळासाहेब घुले विजय टाव्हरे, संजय गोरे चेअरमन यांनी यानी सुरेखाताई निघोट यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुरेखाताई निघोट यांच्यासमवेत युवानेते अक्षय चौधरी, वहातूक सेना प्रमुख सुरेश तांबे, नामदेव पानसरे,शिवाजी चौधरी,माऊली जाधव,विश्वास गव्हाणे, फकिरा गव्हाणे, पप्पु जाधव, फुटाणवाडीचे ,युवराज गावडे,,दादाभाऊ रोडे उपस्थित होते
यावेळी सुरेखाताई निघोट यांनी अंगठी चिन्हावर शिवसैनिकास अपक्ष ऊभं रहावं लागतं ही शिवसैनिकांसाठी शोकांतिका आहे, शिवसेनेच्या अस्तीत्वाचा प्रश्न निर्माण झाला असुन त्यामुळे शिवसैनिक अस्वस्थ झाला असुन पवारांच्या राष्ट्रवादीनं आमच्या मातेसमान शिवसेनेच्या गळयाला नख लावलंय, हे भोळयाभाबडया शिवसैनिकांना अजिबात आवडलं नसुन सर्व एकनिष्ठ शिवसैनिक माझ्याबरोबर आहेत, शिवसेनेसाठी लाखो रुपये खर्च करून ,शेकडो कार्यक्रम घेऊन गावोगावी जाऊन पक्ष काय इतरांच्या चटया ऊचलायला वाढवला का? शिवसैनिकांना भुलथापा देऊन ,आदेशाच्या नावाने काही मोजक्यांनात्यांच्या ताफ्यात सामील केलं,तरी शकडो शिवसैनिकांची मला साथ असुन आंबेगाव विधानसभेवर सुरेखाताई निघोट यांचा भगवा झेंडा फडकवल्याशिवाय रहाणार नाही, तो विजयाचा भगवा मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या सिंहासनावर ठेवायचाय यासाठी शिवसैनिक, सामान्य माणसांनी अंगठी चिन्हास मत देऊन विजयी करावे कारण निवडणुकीपुरते तालुक्यात आलेले निवडणुकीनंतर मुंबई पुण्यात गायब होणार म्हणुन सर्वांनी माझ्यामागे ऊभे रहावे असे आवाहन अंगठी चिन्हावर लढत असलेल्या सुरेखाताई निघोट यांनी केले.
COMMENTS