मंचर दि ४ जुलै शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख प्रा सुरेखाताई निघोट यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य गुणगौरव सो...
मंचर दि ४ जुलै
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख प्रा सुरेखाताई निघोट यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य गुणगौरव सोहळा मंचर येथे पार पडला यावेळी शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या धोरणानुसार आंबेगाव तालुक्यातील दहावी बारावी तसेच स्कॉलरशिप मध्ये पात्र विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि चषक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, जिल्हा संघटक राजाराम बाणखेलें, ऊपजिल्हाप्रमुख दिलीप पवळे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजयाताई शिंदे, तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे तालुका संघटक संतोष पंचरास,ऊपतालुकाप्रमुख भरतशेठ मोरे, महिला ऊपतालुकाप्रमुख चंद्रकला पिंगळे, युवा सेना ऊपतालुका प्रमुख हेमंत एरंडे, मंचर शहरप्रमुख विकास जाधव घोडेगाव शहरप्रमुख नंदकुमार बोर्हाडे, मंचर नगरपंचायत निवडणुक समन्वयक अरुणनाना बाणखेले,विभागप्रमुख माऊली पाटील उपविभाग प्रमुख विकास गायकवाड, महीला शहर संघटक सुवर्णा डोंगरे,शहर समन्वयक शितल बागल, खेड महीला विभाग संघटक कविता गिलबीले,ज्येष्ठ शिवसैनिक सुनिल पिंगळे, बाळासाहेब रोडे, रघुनाथ चक्कर, लांडेवाडी चे मा सरपंच बाळासाहेब निसाळ शेतकरी सेना तालुका प्रमुख डी वाय खानदेशे,निघोटवाडी चे मा सरपंच ज्ञानेश्वर निघोट,ग्रा पं सदस्य व शाखाप्रमुख संदिप निघोट,ग्रा पं सदस्य ऊषा संजय चिंचपुरे, माऊली चिंचपुरे , युवानेते,महेश घोडके , सुरेश निघोट,बाळशिराम निघोट,अशोक लव्हान्डे व शिवसैनिक, गुणवंत शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, सुत्रसंचलन मिथुन पांचाळ तर आभार प्रा.अनिल निघोट यांनी मानले.
COMMENTS