प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाच्यावतीने शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2024 मधील विशेष प्राविण...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाच्यावतीने शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2024 मधील विशेष प्राविण्य मिळवलेल्या जुन्नर तालुक्यातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष प्रवीण ताजणे व सचिव प्रकाश जोंधळे यांनी दिली.
जुन्नर तालुक्याची उज्वल निकालाची परंपरा असून ती अबाधित ठेवण्याचं काम सार्थक तांबे यांनी 99.20% गुण मिळवून केले असल्याचे मत जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे माजी अध्यक्ष रतिलाल बाबेल यांनी व्यक्त केले. तालुक्यात अनुक्रमे तीन असलेल्या सार्थक मंगेश तांबे 99.20 %, बेलवटे श्रावणी गणेश 98.20 %,, प्रसाद अर्चिता मेघनाथ 98% विद्यार्थ्यांचा सत्कार संघाच्या वतीने करण्यात आला. सदर सत्काराप्रसंगी जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजणे, माजी अध्यक्ष रतिलाल बाबेल,सचिव प्रकाश जोंधळे, माजी सचिव टी आर वामन, माजी उपाध्यक्ष वाय बी दाते, उपाध्यक्ष प्रशांत शेटे, खजिनदार व्यंकट मुंढे, ज्येष्ठ सदस्य दिलीप लोंढे, मंगेश तांबे,तालुका समन्वयक प्रमोद जाधव, संभाजीराव शिंदे, अमित डुंबरे आदींसह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS