आंबेगाव तालुका प्रतिनिधी - प्रा अनिल निघोट सर वळती दि १९ जुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसंपर्क अभियान व शिवसेना वर्धापन दिनानिमि...
आंबेगाव तालुका प्रतिनिधी - प्रा अनिल निघोट सर
वळती दि १९ जुन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसंपर्क अभियान व शिवसेना वर्धापन दिनानिमित्त म्हाळुंगे पडवळ व वळती येथील शिवसेना शाखेत पार पडलेल्या आढावा बैठकीत शिवसेना पदाधिकारींनी शिवसैनिकांशी संवाद साधुन पक्षसंघटना वाढीसाठी चर्चा केली.
यावेळी येथील कट्टर निष्ठावंत एकनिष्ठ शिवसैनिक बन्सी आजाब यांची सर्वानुमते शिवसेना ऊपतालुकाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.तसेच आगामी विधानसभा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूका व पदाधिकारी नेमणूकी आणि नागरीकांच्या समस्या, दुधाचे पडलेले भाव, ग्रामीण भागातील एस.टी. बंद असल्याने विद्यार्थी, सामान्य नागरिकांचे हाल यावर आंदोलन करुन न्याय मिळवण्याचा निर्धार करण्यात आला.
शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, जिल्हा संघटक राजाराम बाणखेले तालुका प्रमुख दत्ता गांजाळे, महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख प्रा सुरेखा निघोट, तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे, युवासेना ऊपजिल्हाप्रमुख प्रसन्न लोखंडे, मंचर शहरप्रमुख विकास जाधव शाखाप्रमुख चंद्रकांत भोर उपस्थित होते.
COMMENTS