प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) सोमवार दिनांक २७ मे २०२४ रोजी सावरगाव,ता. जुन्नर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंट फाउंडेशन पुणे ,ग...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
सोमवार दिनांक २७ मे २०२४ रोजी सावरगाव,ता. जुन्नर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंट फाउंडेशन पुणे ,ग्रामपंचयात सावरगाव व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सहावे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. त्यास सावरगाव आणि परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी ९२ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व २६ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले.
शिबिरामध्ये रुग्णांची नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, प्रवास, निवास, नाश्ता व जेवण हे सर्व मोफत दिले जाते. तसेच एका महिन्याची औषधे देखील दिली जातात. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डिसेंट फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.
याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई,सचिव डॉ.फकीर आतार,शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, डॉ. ईशा निरगुडकर,वैद्यकीय अधिकारी डॉ.देवयानी देशमुख,उपसरपंच संजीवनी हिंगे,अशोक बाळसारफ,प्रयोगशाळा तज्ञदिलीप कचेरे, शिवपुत्र कोळी,परिचारिका छाया घोडे,रुपाली ढमढेरे,अशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सावरगाव,प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव,आशा सेविका यांनी प्रयत्न केले.
COMMENTS