प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) सोमवार दिनांक २० मे २०२४ रोजी आळे,ता. जुन्नर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंट फाउंडेशन पुणे सुवर्ण...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
सोमवार दिनांक २० मे २०२४ रोजी आळे,ता. जुन्नर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंट फाउंडेशन पुणे सुवर्णयुग युवा मंच आळेफाटा व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्यांदा नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. त्यास आळे, संतवाडी,कोळवाडी व वडगाव आनंद आणि परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी ११२ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व ४१ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले.
शिबिरामध्ये रुग्णांची नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, प्रवास, निवास, नाश्ता व जेवण हे सर्व मोफत दिले जाते. तसेच एका महिन्याची औषधे देखील दिली जातात. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डिसेंट फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.
याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे,सचिव डॉ.फकीर आतार,शिबिर समन्वयक प्रकाश पाटील,आदिनाथ चव्हाण, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागाजी शेळके,उपाध्यक्ष किसनराव जाधव, सचिव दिघे , माजी सैनिक जालिंदर माळी, किसन बहिरट,विठ्ठल पिंगळे, योगेश वाघचौरे,अशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सुवर्णयुग युवा मंच आळेफाटा ,जेष्ठ नागरिक संघ आळे व प्राथमिक आरोग्य केंद्र आळे यांनी प्रयत्न केले.
COMMENTS