संपादिका- प्रतिभा किर्तीकर्वे. मित्र मेळा परिवार व अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती वतीने यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्...
संपादिका- प्रतिभा किर्तीकर्वे.
मित्र मेळा परिवार व अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती वतीने यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व दादासाहेब फाळके जंयती निमित्त विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, तसेच समाज भूषण पुरस्कार, शिक्षण व समाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हेमंत गायकवाड यांना पुरस्कार देण्यात आला, तसेच गीतकार गौतम पगारे यांच्या "आलं आलं रे वादळ निळ" या गीताला प्रथम पारितोषिक ग्रुप सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व रोख ५००० रू भेट देण्यात आले. या ग्रुप डान्सच्या टिम लीडर प्रतिभा किर्तीकर्वे या होत्या तसेच कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गौतम पगारे हे होते, यावेळी अशोक भाऊ दिवे महापौर नासिक, राजेन्द्र कन्नू ताजणे संस्थापक मित्र मेळा, गौतम भाऊ पगारे कोवीड योध्दा, गितकार गायक चित्रपट निर्माता सोमनाथ गायकवाड अध्यक्ष अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती विशाल तेजाळे समाजिक नेते हे उपस्थित होते, यावेळी समीर सुयोग फिल्म प्रोडक्शनच्या वतीने जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.
COMMENTS