प्रतिनिधी : शितल भगत चंद्रयान तीन विषयावर रंगभरण स्पर्धेत पंधरा हजार विद्यार्थी वर्गाचा सहभाग. पुणे ; 22 एप्रिल:* साई कला आविष्कार नाट्य संस...
प्रतिनिधी : शितल भगत
चंद्रयान तीन विषयावर रंगभरण स्पर्धेत पंधरा हजार विद्यार्थी वर्गाचा सहभाग.
पुणे ; 22 एप्रिल:* साई कला आविष्कार नाट्य संस्था ,भोसरी व श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान आणि कोहिनूर ग्रुप, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी वर्गात चित्रकलेची आवड निर्माण व्हावी. कलासक्त नागरिक घडावे. या उद्देशाने दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात संपन्न होते. या तेराव्या वर्षी चंद्रयान -3 या विषयावर ही रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. पंधरा हजार विद्यार्थी वर्गाने सहभाग घेतला. संस्थेच्या वतीने प्रत्येक सहभागीना फोर कलर आकर्षक सन्मानपत्र देण्यात आले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका व कलाशिक्षक कलाशिक्षिका यांना सुंदर स्मृतीचिन्ह देऊन सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. शालेय स्तरावर तीन क्रमांक काढण्यात आले. त्यांना सन्मानपत्र , गोल्ड मेडल देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते समारंभ पूर्वक गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर, प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक बसवराज कल्लोळी, माजी सीनियर मॅनेजर टाटा मोटर्स रमाकांत आडके, मराठी विभाग प्रमुख महात्मा फुले महाविद्यालय प्राध्यापक डॉ. प्रा. पांडुरंग भोसले, मॉर्डन महाविद्यालय पुणे प्रा.डॉ.रुपेश बनसोडे,
जयहिंद इंटरनॅशनल स्कूल प्राचार्य डॉ.किरण पैठणकर इ. मान्यवर उपस्थित होते.
वृक्षाला पाणी घालून व पूजन करून पर्यावरणाचा संदेश देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
"सवय लागणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या प्रयोगातून शास्त्रज्ञ घडत असतो. आपल्या प्रत्येकात एक शास्त्रज्ञ बनण्याची क्षमता आहे. देशाच्या विकासामध्ये आपली बौद्धिक कौशल्य, ज्ञान, शिक्षण उपयोगात आणणे आवश्यक आहे. परिश्रमाने यशाकडे कडे जाता येते, विद्यार्थी वर्गात अशा उपक्रमामुळे विज्ञानवादी दृष्टिकोन वाढण्यास मदत होत आहे. भविष्यातील अनेक शास्त्रज्ञ या कार्यक्रमातून घडणार आहे. अशी आशा आहे. मुलांच्या सुप्त कलागुणांचा विकास करण्याची जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहे. भारताचे संशोधनामध्ये भविष्य उज्वल आहे. मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या सोबतच्या आठवणी सुद्धा यावेळेस सांगण्यात आल्या."आपल्या मनोगतात शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांनी यावेळीआपली भूमिका स्पष्ट केली. त्याचप्रमाणे इतर ही मान्यवरांनी विद्यार्थी वर्गास मार्गदर्शन केले.
यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती .त्यात प्रथम क्रमांक प्रकाश मौर्य-रत्नागिरी, द्वितीय क्रमांक वैभव पाटील-नवी मुंबई, तृतीय क्रमांक तेजस कासार-चिपळूण यांनी यश संपादन केले. त्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र बुक देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच उत्तम सहभाग शाळेला राज्यस्तरीय उत्कृष्ट सहभाग दौलत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना चषक सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यात जयहिंद इंटरनॅशनल स्कूल कुरण ,जुन्नर. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, उरुळी कांचन. मातोश्री पार्वताबाई कुंभार प्राथमिक शाळा,. दौंड. एस पी जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल,भोसरी यांना सन्मानित करण्यात आलं.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साई कला आविष्कार नाट्य संस्थेचे संस्थापकअध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी केले.संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. भविष्यातील विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी यशवंत घोडे यांनी केले. आविष्कार रंग या नावाने चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये विकास राऊत, आनंद मुळक, साईराजे सोनवणे, बबन चव्हाण,
यशवंत घोडे,यशवंत गायकवाड यांनी संयोजनात पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. संपूर्ण महाराष्ट्रातून मुख्याध्यापक, कलाशिक्षक ,पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बहारदारपणे हा सोहळा सायन्स पार्क नाट्यगृह चिंचवड येथे उत्साहात संपन्न झाला.
विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
COMMENTS