लेख: एक गुढी उभारू मानवतेची- लेखिका : शितल भगत. | CrimeNama
Loading ...

लेख: एक गुढी उभारू मानवतेची- लेखिका : शितल भगत.

  मराठी नुतनवर्षाचा हा महाराष्ट्रीयन मराठमोळा सण म्हणजे गुढीपाडवा कोणत्या ही सणामागे शास्त्र असत मग ते आपल्यावर अवलंबून असतं मग ते धार्मिक क...

 


मराठी नुतनवर्षाचा हा महाराष्ट्रीयन मराठमोळा सण म्हणजे गुढीपाडवा कोणत्या ही सणामागे शास्त्र असत मग ते आपल्यावर अवलंबून असतं मग ते धार्मिक किंवा वैचारिक की आपण त्यास कोणत्या दृष्टीने पाहतो. धार्मिक म्हटल्याप्रमाणे धार्मिक भावना त्यात येतात

आणि हिंदू धर्मात गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात चैत्र आरंभ असतो.तर याचेच वैचारिक विस्तृत मंथन केले तर जाणवेल याची दुसरी बाजू म्हणजेच मानवतेची गुढी मानवतेची गुढी? अशी पण गुढी कुठे भेटते का ? असा प्रश्न पडला असेल. हो. मानवतेची गुढी ती कुठे भेटत नाही तर आपल्या प्रत्येकाच्या मनात असते फक्त ती जागृत आहे की निद्रेत हे महत्वाचं असत. 

मानवता दिसून येते ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावरकर,महात्मा फुले सावित्रीबाई फुले,कर्मवीर भाऊराव पाटील, ताराबाई यांसारख्या अनेक समाजसुधारकांकडून माणसे जातात परंतु त्यांचे मोठे मन प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर करून जातात. आणि हेच त्यातले थोडे तरी व्यक्तिमत्त्व आपल्यात आले तर आपण खरच माणूस म्हणून जगायला शिकलो. बोलण्यापुरते नाही तर प्रत्यक्ष जेव्हा आपल्यातली माणुसकी जागी होईल तेव्हा तुझ्यातला स्व ला तुझी ओळख होईल.

आज पाहता तुझे विक्राळ रूप दिसते. रस्त्यावर झालेला अपघातात पडलेला घायाळ माणूस तुला दिसत नाही. मुली वर होणारा बलात्कार तुला दिसत नाही की पैशांपुढे तुला तुझा रक्ताच्या नात्याचा भाऊ दिसत नाही. तुला घरच्यांसाठी वेळ नाही तर तू समाजासाठी तू काय करणार ? न्याय न्याय ओरडुन काही च होणार नाही जेव्हा तू स्वतः तुझ्यात बदल घडवून आणत नाही तोपर्यंत दमलेल्या बाबाची कहाणी तील बाप तिच्यासाठी अनोळखी नसेल. समीर सावंत याची हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे  वागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे

प्रत्ययास येईल. अन् माणूसपण गारठलय अशी वेळ न येता मानवतेची ही गुढी एकाच्या तरी मनात भेटेल.

संपण्याआधी सर्वकाही तुझी ओळख

जागव आता तरी तुझ्यातला तू अन् सिद्ध कर स्वतःचे व्यक्तिमत्त्व

मानवा आज एक गुढी ही तुझ्यासाठी

तुझ्यातला तुला ओळखण्यासाठी

एक गुढी ही समाजासाठी

तुझा एक हात त्यांच्या मदतीसाठी

विसरून जात पात

तू ही आता मानवता जागी कर.

आक्रोश अन्यायविरुद्ध आता तरी आवाज उठव....

आणि एक माणूस म्हणून तू इतरांसाठी जग...

COMMENTS

BLOGGER: 1

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: लेख: एक गुढी उभारू मानवतेची- लेखिका : शितल भगत.
लेख: एक गुढी उभारू मानवतेची- लेखिका : शितल भगत.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgVf1siVtfjXD-S8Gzcha5HEr1A_dRM4UNQGTkD7TV8qfWM5oGDSZyoU-i0_zsg4m6g6RnXZjIiMCoFlAvgABUymsP9LGYQJaKzHLqmnH0D9T04x-Ls-tuT_Tb_wk8XdBPWD-bpuvvIi2QVZSj95aUDRfbFl0TJtFXgK8hcX193_R4rAVt8mIeGQ2uWZbQ/s320/Thumbnail_1712808457158.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgVf1siVtfjXD-S8Gzcha5HEr1A_dRM4UNQGTkD7TV8qfWM5oGDSZyoU-i0_zsg4m6g6RnXZjIiMCoFlAvgABUymsP9LGYQJaKzHLqmnH0D9T04x-Ls-tuT_Tb_wk8XdBPWD-bpuvvIi2QVZSj95aUDRfbFl0TJtFXgK8hcX193_R4rAVt8mIeGQ2uWZbQ/s72-c/Thumbnail_1712808457158.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2024/04/blog-post_26.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2024/04/blog-post_26.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content