प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर ) पेठ दि १२ आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील खंडोबा मंदिर सभागृहात भार्गव शशिकांत पवळे याच्या पहिल्या वाढदि...
प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर )
पेठ दि १२
आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील खंडोबा मंदिर सभागृहात भार्गव शशिकांत पवळे याच्या पहिल्या वाढदिवसाला पुणे जिल्ह्यातील नामांकित बैलगाडामालकांसह पारगाव आणि पेठ गाव व सातगाव पठारावरील हजारावर लोकांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.प्रसिद्ध फायनल सम्राट आणि बैलगाडाशर्यतीचे बैल झेंडया व सुलतान या हिंदकेसरींचे मालक फायनल चे मानकरी ब्रजेश रखमाजी धुमाळ यांच्या भाच्याचा पहिलाच वाढदिवस असल्याने अनेकांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या ज्यात बाजार समिती संचालक, पारगावचे सरपंच सचिन पानसरे, भारतीय विद्यार्थी सेना आंबेगाव मा.तालुका प्रमुख प्रा.अनिल निघोट, पेठ चे सरपंच संतोष धुमाळ,वाकेश्वर विद्यालय संचालक महेंद्र धुमाळ,बैलगाडा कारागीर अनिल पवळे प्रसिद्ध अनाऊंसर माऊली पिंगळे, साहेबराव आढळराव, प्रसिद्ध बैलगाडा मालक रामनाथ वारिंगे-,शशिकांत सणस,लहु सातपुते पी एस आय,बाबाजी सातपुते
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिकेत गुंजाळ पिंटु शेलार, विकास सुट्टे, गणेश अंधारे,बंडु पवार यांनी प्रयत्न केले, वाढदिवसानिमित्त बालचमुंना टिफिन बॉक्स व सर्वांसाठी भोजन व्यवस्था होती.हजारावर उपस्थितांचे आपल्या मधुर आवाज आणि खास शैलीत प्रसिद्ध निवेदक अमित कातळे यांनी स्वागत केले तर आयोजक फायनल सम्राट ब्रिजेशशेठ धुमाळ यांनी आभार मानले
COMMENTS