श्री शिव छत्रपती महाविद्यालयामध्ये जागर‘ती’च्या आरोग्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न. | CrimeNama
Loading ...

श्री शिव छत्रपती महाविद्यालयामध्ये जागर‘ती’च्या आरोग्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.

  प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) जुन्नर : जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ जुन्नर संचलित श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर, ये...

 


प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )

जुन्नर : जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ जुन्नर संचलित श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर, येथे जागर 'ती' च्या आरोग्याचा' हा कार्यक्रम विद्यार्थिनी मंच व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. अॅड .संजय शिवाजीराव काळे साहेब यांच्या प्रेरणेने करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.सौ. गौरीताई बेनके(अंजनी उन्नती फाउंडेशन) आणि मा.डॉ. स्मिता डोळे(डोळे हॉस्पिटल) यांना आमंत्रित करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सौ गौरीताई बेनके आणि डॉ. स्मिता डोळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाघमारे होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी महिला तालुका कार्याध्यक्ष मा. आरती ढोबळे, अंजनी उन्नती फाउंडेशनचे समन्वयक मा. शितल देशमुख, मा. श्री संतोष ढोबळे, महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रतिनिधी मा.प्रा. विलास कुलकर्णी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य व विज्ञान शाखाप्रमुख मा. डॉ. रविंद्र चौधरी, कला शाखाप्रमुख डॉ.अभिजीत पाटील,वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. सतीश जाधव, प्रभारी प्रबंधक मा. सौ.मनीषा कोरे उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा. डॉ. स्मिता डोळे यांनी महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. स्त्रीने स्वतःचे आरोग्य जपले पाहिजे तरच ती सक्षमपणे कुटुंबाची काळजी घेऊ शकते, स्त्रीने यासाठी उत्तम आहार व व्यायामाची जोड दैनंदिन जीवनात करावी या संदर्भात अमूल्य असे मार्गदर्शन केले. यानंतर मा. सौ गौरीताई बेनके यांनी स्त्री म्हणून जन्माला येणं वरदानच आहे, त्यांनी महाविद्यालयातील मुलींना कर्तुत्वान बनण्यासाठी, आपला आत्मसन्मान जपण्यासाठी व  आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरणा दिली. महिला दिनाचे औचित्य साधून गौरीताईंच्या मार्गदर्शनाखाली अंजनी उन्नती फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी आरोग्यविषयक जनजागृती चे विशेष कार्यक्रम ग्रामीण भागातील शाळा-कॉलेजेस मध्ये त्यांनी विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन चे वाटप देखील केले. या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी महाविद्यालयातील  विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन चे वाटप केले असून दर दोन महिन्यांनी विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे यांनी अध्यक्ष भाषणात विद्यार्थिनींना आरोग्य विषयक मार्गदर्शन करून कार्यक्रमासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी मंचाच्या संचालिका डॉ. वंदना नढे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रेखा गायकवाड व डॉ.वर्षा देसाई यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: श्री शिव छत्रपती महाविद्यालयामध्ये जागर‘ती’च्या आरोग्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.
श्री शिव छत्रपती महाविद्यालयामध्ये जागर‘ती’च्या आरोग्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhJW9q_KfgIz6Bwo2QRrn0-jZnf9k1TmzzkYITBjl3inUeCuWODF_JB4MxS07q0nry7cU16dAtd3GeWgehGAgjeUwWcgPSUgUbAoUpp_cCJHTUKQ0M4v0IV-rXPr4QZiAE-ySOi_HPl6mUt1PkzLErI2BKRWguE65rAGd7NRy-DDTK-vEQqrLfMgj26aq8/s320/IMG-20240307-WA0330.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhJW9q_KfgIz6Bwo2QRrn0-jZnf9k1TmzzkYITBjl3inUeCuWODF_JB4MxS07q0nry7cU16dAtd3GeWgehGAgjeUwWcgPSUgUbAoUpp_cCJHTUKQ0M4v0IV-rXPr4QZiAE-ySOi_HPl6mUt1PkzLErI2BKRWguE65rAGd7NRy-DDTK-vEQqrLfMgj26aq8/s72-c/IMG-20240307-WA0330.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2024/03/blog-post_7.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2024/03/blog-post_7.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content