जुन्नर : जुन्नर तालुक्यातील प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रुप व स्पार्क मिंन्डा फाउंडेशन...
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रुप व स्पार्क मिंन्डा फाउंडेशनच्या वतीने १४ फेब्रुवारीला श्री कालिका माता मंगळ कार्यालया कासार आळी जुन्नर येथे मा. श्री. सत्यशिल दादा शेरकर चेअरमन श्री विघ्नहर कारखाना यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना जनजागृती अभियान अंतर्गत मोफत साहित्य वाटप पुर्व नाव नोदणी व तपासणी करून घेतली होती अशा १७८ दिव्यांग लोकांना चाकण येथे रविवार दिनांक २५ फेब्रुवारीला साहित्य घेण्यासाठी जुन्नर तालुक्यातून दोन बस ची सोय करण्यात आली होती चाकण आळंदी फाटा येथे स्पार्क मिंन्डा फाउंडेशन कडून रविवारी साहित्य वाटप करण्यात आले या वेळी १५ व्हील चेअर, वाॅकर, काठी, कृत्रिम हात, पाय, कुबडया, कॅलिपर, बुट इत्यादी साहित्य १७८ लोकांना मोफत वाटप करण्यात आले.
तसेच दिव्यांग लोकांना रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन, ऑनलाईन प्रमाण पत्र काढण्यासाठी ऑनलाईन रजिस्टर व युनिक कार्ड नोदणी करण्यात आली आलेल्या सर्व दिव्यांग बांधवांना जेवणाची सोय स्पार्क मिंन्डा फाउंडेशन टीम च्या वतीने करण्यात आली या वेळी संभाजी भांगरे साहेब दिव्यांग कक्ष अधिकारी जुन्नर तालुका , निलेश पवळे सर स्पार्क मिंन्डा फाउंडेशन, श्री राधेश्याम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण व अरूण शेरकर अध्यक्ष याच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग लोकांना सर्व सुविधा देण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच स्पार्क मिंन्डा फाउंडेशनच्या वतीने श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रुपला दिव्यांग लोकांना शासनाच्या विविध योजना, जनजागृती अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करून दिव्यांग लोकांच्या विविध अडचणी संस्थेच्या माध्यमातून सोडवण्यात येत आहे या उल्लेखनीय कामा निमित्त स्पार्क मिंन्डा फाउंडेशन नॅशनल अवार्ड विजेते व स्पार्क मिंन्डा फाउंडेशनचे प्रमुख CSR श्री प्रवीण कर्ण यांच्या हस्ते श्री दिपक चव्हाण संस्थापक व अरूण शेरकर अध्यक्ष यांचा व टीम चा सत्कार करण्यात आला या वेळी श्री कमलेश मोतीवाले श्री महावीर जैन विदयालय पुणे
श्री निलेश पवळे सर CSRस्टेट हेड महाराष्ट्र स्पार्क मिंन्डा फाउंडेशन, तरूण शर्मा, अकबर शेख, श्रीहरी नायकोडी, केरभाऊ नायकोडी, सुनिल जंगम, सौ.सुनिता ताई जंगम, डावखर, झिंझाड, संचित घोगरे, उल्हास कासार व गोविंद ढमाले, फरहान मीर अली जुन्नर तालुक्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते
COMMENTS