मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर या ठिकाणी भाजी मंडई, मांजरे आळी, इथे ४२ वर्षापासून दलित कुटुंब, वयवृद्ध अपंग, कॅन्सर अशा आजाराची झुंज देणारे...
मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर या ठिकाणी भाजी मंडई, मांजरे आळी, इथे ४२ वर्षापासून दलित कुटुंब, वयवृद्ध अपंग, कॅन्सर अशा आजाराची झुंज देणारे आयु सुरेश दत्तात्रेय वराडे राहत आहे, ४२ वर्षा अगोदर मंचर ग्रामपंचायत यांनी ठराव पास करून घर बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली असून, दलित कुटुंब वराडे हे ४२ वर्षापासून पाणीपट्टी, घरपट्टी,लाईट बिल, बिकट परिस्थिती असताना प्रामाणिकपणे भरत आले आहेत, ग्रामपंचायतचे नगरपंचायत होताच हुकुमशाही पद्धतीने दलित कुटुंब वराडे यांना टारगेट करून घर खाली करण्याचे ६ महिने पूर्वीपासून नोटीस बजवत आहे. परंतु दलित कुटुंब वराडे हे ६ महिन्यापासून भयभीत झाले असून त्यांना कोणतीही जमीन, घर नसल्या कारण वयोवृद्ध असल्या कारण आज त्यांना सतत विचार करून करून आत्महत्या केल्या शिवाय पर्याय राहिला नाही. वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुका या पक्षातील कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून दलित कुटुंब वराडे यांनी मंचर नगरपंचायत त्यांच्या विरोधात तक्रार अर्ज देण्यात आले. गोरगरीब जनतेला असे घर खाली करण्याचे हुकूमशाही पद्धतीने नोटीस देऊन आज पीडित कुटुंब रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून पीडित कुटुंबाला न्याय,हक्क मिळवून देण्यासाठी सज्ज होऊन लढा उभारणार आहे. आंबेगाव तालुक्यातील जनतेने सतर्क राहावा व आशा लोकशाही च्या जगामध्ये हुकुमशाही जन्म घेत असेल तर वंचित बहुजन आघाडी खपून घेणार नाही. मंचर नगरपंचायत यांना वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुक्याच्या वतीने इशारा आहे की पीडित कुटुंबांना वारंवार नोटीस देऊन मानसिक त्रास देणे हे थांबवावे, व दलित कुटुंबाच्या घराची इट जरी सरकली,भविष्यात वराडे कुटुंब जीव गमुन बसल्यास मंचर नगरपंचायत जवाबदार असले, वराडे कुटुंब यांना योग्य ते न्याय मिळवून द्यावा अन्यथा आंबेडकरी जनता व वंचित बहुजन आघाडी (आंबेगाव तालुका), सर्व कार्यकारणी मंचर नगरपंचायत वर आंदोलन घेतल्याशिवाय राहणार नाही.. असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे पंकज भाऊ सरोदे (तालुका उपाध्यक्ष) यांनी दिले आहे. उपस्थिती शिवाजी राजगुरू (तालुका अध्यक्ष), पंकज भाऊ सरोदे (तालुका उपाध्यक्ष), सुरेश रोकडे (तालुका सचिव), मधुकर चाबुकस्वार (तालुका महासचिव), साधू शेठ लवांडे (तालुका सल्लागार), रोहिदास शिशुपाल (तालुका सचिव), संभाजी राजगुरू (सचिव), रतन साबळे (सदस्य), शुभम जेटके (तालुका सचिव), दिपालीताई साबळे (तालुका अध्यक्षा), संगीता ताई मिरके (तालुका उपाध्यक्ष), शीतला ताई मोरे (तालुका सचिव), व प्रदीप गौतम साळवे (नवी मुंबई निरीक्षक - वंचित बहुजन माथाडी व ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन) संपूर्ण कार्यकारणी आणि सदस्य.
COMMENTS