अष्टविनायक गणपतीपैकी एक तिर्थक्षेत्र असलेले व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय राम...
अष्टविनायक गणपतीपैकी एक तिर्थक्षेत्र असलेले व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय रामदास ढेकणे यांना नुकतीच वकील पदवी मिळाली आहे. त्यांनी मराठवाडा मित्रमंडळ शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज पुणे येथुन एल.एल.बी. ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. तसेच ते सर्टीफाय ऑडीटर असुन इन्कमटॅक्स कन्सलटंट देखील आहेत. श्री लेण्याद्री गणपती देवस्थानला याचा निश्चीतच चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे. त्यांचे श्री लेण्याद्री गणपती देवस्थानच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौंतुक होत आहे. अशी माहीती देवस्थानचे उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सचिव शंकर ताम्हाणे व खजिनदार भगवान हांडे यांनी दिली.
COMMENTS