प्रतिनिधी ः प्रा. अनिल निघोट ( सर ) वडगाव काशिंबेग दि.४ फेब्रुवारी मोरया अर्धपीठ गणपती तिर्थक्षेत्र वडगाव काशिंबेग येथे गणेश जयंती व शंकर श...
प्रतिनिधी ः प्रा. अनिल निघोट ( सर )
वडगाव काशिंबेग दि.४ फेब्रुवारी
मोरया अर्धपीठ गणपती तिर्थक्षेत्र वडगाव काशिंबेग येथे गणेश जयंती व शंकर शेठ पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त नामांकित बैलगाडा सहभागी झाल्याने बैलगाडा शर्यतीसाठी हजारोंच्या उपस्थितीत यात्रा पार पडली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख प्राध्यापक सुरेखा निघोट, प्रा.अनिल निघोट,मा तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना,जि.प.सदस्य देविदास दरेकर, प्रसिद्ध बैलगाडा मालक शंकरशेट काटे, बन्सी घोडे चेअरमन, दत्तात्रय आवटे, पैलवान दिलीप भरणे, ब्रजेश धुमाळ, बाबाजी शेठ टेमगीरे, ढोबळे चेअरमन,कै पांडुरंग भक्ते,रामनाथ वारिंगे, मारुती वाबळे,यावेळी उपस्थित होते
एकुण १३६ पैकी प्रथम क्रमांकात ३२ , द्वितीय क्रमांकात ४१ तर ११.२५ सेकंदासह टिंगरे -ब्रजेश धुमाळ पेठ आणि रामनाथ वारिंगे मोटरसायकल चे मानकरी ठरले.
यात्रा नियोजन सरपंच वैभव पोखरकर बाळासाहेब शिंदे, राम डोके, विलास शेटे, शांताराम भैये,महेश डोके, हनुमंत शेटे,सुखदेव शेटे, विष्णू वाळुंज, संजय वायकर यांनी तर अनाऊंसर माऊली पिंगळे, साहेबराव आढळराव, लक्ष्मण बांगर यांनी केले.
COMMENTS