आंबेगाव तालुका प्रतिनिधी प्रा अनिल निघोट लांडेवाडी दि.१३ फेब्रुवारी आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील शेवाळवाडीतील भव्य गणेशमंदिरात शेव...
आंबेगाव तालुका प्रतिनिधी प्रा अनिल निघोट
लांडेवाडी दि.१३ फेब्रुवारी
आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील शेवाळवाडीतील भव्य गणेशमंदिरात शेवाळवाडी येथे आयोजित गणेश जयंती कार्यक्रमात सिद्धीविनायक अखंड हरिनाम सप्ताहात हभप दत्तात्रय महाराज रुकारी यांचे काल्याचे किर्तन , अन्नप्रसाद भंडारा भाविक भक्तांच्या मोठ्या उपस्थितीसह पार पडला. यावेळी कमलजादेवी महिला मंडळाचे हळदी कुंकू तर जि.प.शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला प्रा.सुरेखाताई निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख तसेच प्रा.अनिल निघोट,भारतीय विद्यार्थी सेना आंबेगाव तालुका यांनी उपस्थित राहुन ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी लांडेवाडीचे सरपंच व मराठा महासंघाचे अध्यक्ष अंकुश लांडे, शिवसेना विभागप्रमुख मा सरपंच तान्हाजी शेवाळे जयसिंग शेवाळे, किसनराव शेवाळे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी ऊत्तम नियोजन व्यवस्था ऊत्सव कमिटी अध्यक्ष बबनराव शेवाळे, उपाध्यक्ष भगवान शेवाळे, अरुण शेवाळे, मंगल बेंडे,ग्रा पं सदस्य ऊर्मिला शेवाळे,मा सरपंच मधुकर निळकंठ, अबोली पिंगळे, अनिल गाढवे व सिद्धीविनायक ग्रुप चे निखिल शेवाळे यांनी कार्यक्रमाची व्यवस्था पाहिली.
सुत्रसंचलन विनायक शेवाळे यांनी केले.
COMMENTS