प्रतिनिधी : शरद शिंदे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे शाळेची वार्षिक तपासणी संपन्न झाली. याप्रसंगी आपटाळे बीटच्या विस्ताराधिकारी मा. सं...
प्रतिनिधी : शरद शिंदे
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे शाळेची वार्षिक तपासणी संपन्न झाली. याप्रसंगी आपटाळे बीटच्या विस्ताराधिकारी मा. संचिता अभंग मॅडम, उच्छिल केंद्राच्या केंद्रप्रमुख मा. पुष्पलता पानसरे मॅडम, आपटाळे केंद्राचे केंद्रप्रमुख मा. भवारी साहेब, मा. भरत बोचरे सर, मा. रामदास डामसे सर व मा .बा. तु. मुंढे सर उपस्थित होते.
सर्वांनी वर्ग तपासणी करुन शालेय गुणवत्तेचा आढावा घेतला. तसेच शालेय परिसर, परसबाग, भौतिक सुविधा, शालेय उपक्रमांची पहाणी करुन शालेय रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम प्रात्यक्षिक सादर केले. शाळेतील लोकसहभागातून झालेल्या कामांचे कौतुक केले.
शाळा तपासणी करुन विस्ताराधिकारी मा. संचिता अभंग मॅडम यांनी समाधान व्यक्त केले व गुणवत्ता वाढीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शाळेच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले.
COMMENTS